क्रीडारत्नागिरी

सिनियर स्त्री-पुरुष गटाच्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेची निवड चाचणी 2025-26 उत्साहात संपन्न

रत्नागिरी दि. १३ :-  कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र (KAM) या राज्य संघटनेमार्फत राज्यस्तरीय स्त्री-पुरुष सिनियर गटाच्या 21 वर्षाखालील व 21 वर्षावरील स्पर्धेचे आयोजन डिस्ट्रीक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे करण्यात आलेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी व्हावा यासाठी कराटे असोसिएशन रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, या अधिकृत जिल्हा कराटे संघटने मार्फत जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेची निवड चाचणी 2025-26 जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारुती मंदिर रत्नागिरी येथे दिनांक :-11 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली होती.

सदर स्पर्धेकरिता रत्नागिरीतील 10 कराटे खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यामध्ये 21 वर्षाखालील वयोगटातील – 55 किलो वजन गटाखालील फाईट प्रकारा मध्ये

कु.तेजस दीपक जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच कु. दिव्य सुनील यादव याने काता प्रकारा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

84 किलोवरील वजन गटामध्ये फाईट प्रकारात कु.वेदांत महेंद्र सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला,

21 वर्षावरील सिनियर वयोगटामध्ये -67 किलो खालील वजन गटामध्ये श्री. प्रशांत चंद्रकांत जाधव यांनी काता व फाईट दोन्ही प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावला विजयी झालेल्या सर्व कराटे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये करणार आहेत,

सदर कराटे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजय झाल्यास त्यांना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी व 21 वर्षावरील कराटे खेळाडूंना 5% शासकीय आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

सदर स्पर्धेच्या निवड चाचणीचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी प्रितम कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष जावेद मिरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले,

जिल्हास्तरीय निवड चाचणीचे व्यवस्थित पणे संपन्न होण्यासाठी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी सचिव सुरज बने, खजिनदार अरुण बेग, सदस्य रितेश बेग, नौशीन कापडी, अयान मिरकर, प्रथम बेग, रिया माचकर, ध्रुव बसणकर या सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्हास्तरीय सिनियर अजिंक्यपद स्पर्धेची निवड चाचणी यशस्वीरित्या संपन्न झाली व सर्वांनी विजयी झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button