रत्नागिरी

आर्ट व्हिजन संस्थेचे १४ वे कला प्रदर्शन आज मुंबईत 

तरवळ दि. ३० (अमित जाधव) :-  आर्ट व्हिजन या कला संस्थे मार्फत भरविण्यात येणारे १४ वे कला प्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे दिनांक ३०डिसेंबर २०२५ ते ५ जानेवारी २०२६ पर्यंत भरविण्यात येणार आहे.

३० डिसेंबर रोजी सकाळी या कला प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे त्यानंतर सकाळी ११.०० ते सायं. ७.०० पर्यंत दररोज हे कला प्रदर्शन सर्व कला रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या कला प्रदर्शनात नामवंत व प्रसिद्ध कलाकारांच्या चित्रांच्या प्रतिकृती कला रसिकांना पाहता येणार आहेत.

हे कला प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी येथील प्रख्यात कला शिक्षक अर्जुन माचिवले तसेच प्रसिद्ध चित्रकार महेश कदम, रियाझ काझी, रोशन गोताड, अरबाज उस्मानी असे चित्रकार विशेष मेहनत घेत आहेत. तसेच परिसरातील कला शिक्षकांनी सुद्धा भाग घेतला आहे.

या कला प्रदर्शनात रत्नागिरीतील सुपुत्र अर्जुन माचिवले, रोशन गोताड हे आपली चित्रे तसेच या प्रदर्शनाचे नियोजन करणार आहेत. विद्यार्थ्यांना कलेचे धडे देत देत आपल्या ही कलेचा विकास हे सर्व कलाशिक्षक गेली २५ वर्षे करीत आहेत. या कला प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नवोदित कलाकारांनी तसेच कला रसिकांनी आस्वाद असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button