रत्नागिरी

साडवली येथे विहिरीमध्ये आढळला बिबट्या

रत्नागिरी दि. ५ ऑगस्ट :- संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे एका खासगी विहिरीमध्ये बिबट्या आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.

याबाबत गावातील श्री. राजेश पर्शराम चव्हाण साडवली (नैदरवाडी) यांच्या खाजगी विहिरीमध्ये बिबट हा वन्य प्राणी पडला असले बाबत कळवलेनुसार परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख व स्टाफ मिळून आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, सदर विहीर आयातकृती विहीर ५ x १२ फुट लांबी रुंदीची व सुमारे २० फूट खोल असल्याचे दिसून आले. सदर विहिरीत एक बिबट वन्यप्राणी पडलेला दिसला. सदर बिबट्या हा विहिरीत आठवड्याचा आधार घेऊन पाण्यात पोहत असल्याचा दिसून आला. संपूर्ण परिस्थितीची पाहणी करुन लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून पिंजरा विहिरी मध्ये सोडला असता काही क्षणातच बिबट्या पिंजऱ्यामध्ये येऊन सुरक्षित जेरबंद झाला. त्यानंतर सदर बिबट्याची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघु चिकित्सालय देवरुख यांचे कडून तपासणी करून घेऊन सदर बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सदरील रेस्क्यू ऑपरेशन माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई, मा.सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, मा परिक्षेत्र वन अधिकारी श्री विक्रम गुरव यांचे मार्गदर्शनाखाली मा वनपाल संगमेश्वर देवरुख श्री सागर गोसावी, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे,वनरक्षक फुणगूस श्री आकाश कडुकर, वनरक्षक आरवली श्री सुरज तेली, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे,प्राणी मित्र अनुराग आखाडे यांनी केली.

सदरील रेस्क्यू ऑपरेशन करतेवेळी पोलीस पाटील साडवली व मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचेही रेस्क्यू ऑपरेशनसाठी चांगले सहकार्य लाभले.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख श्री सागर गोसावी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button