रत्नागिरी

गुहागर समुद्रात तीनजण बुडाल्याची घटना; एकाचा मृत्यू

गुहागर दि. २७ :- ख्रिसमस सुट्टी निमित्त व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटनाकरिता गुहागर शहरांमध्ये दाखल झालेल्या पर्यटक कुटुंब समुद्रामध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने खोल पाण्यात गेल्याने तीनजण बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत तिघांपैकी दोघांना जीवरक्षकांनी वाचवले असून अन्य एकाचा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू होण्याआधीच मृत्यू झाला. अमोल मुथिया (वय ४२, रा. मुंबई) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.

मुंबईहून आलेले पर्यटक गुहागर किनाऱ्यावर समुद्रात उतरले होते. सुरुवातीला सगळे काही सुरळीत सुरू होते, मात्र क्षणातच समुद्राचा रौद्र अवतार दिसू लागला. जोरदार प्रवाहामुळे तिघे पर्यटक बुडू लागले. आरडाओरड होताच आजूबाजूला असलेल्या स्थानिकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले आणि कोणतीही सुरक्षा साधने नसताना थेट समुद्रात उड्या मारत बचावकार्य सुरू केले. जीव धोक्यात घालून त्यांनी तिघांना बाहेर काढले.

या घटनेत अमोल मुथिया (वय ४२, रा. मुंबई) यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्यांना तातडीने गुहागर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे किनाऱ्यावर शोककळा पसरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button