रत्नागिरी

शिक्षणातील जाचक अटीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी उद्या देवरुख येथे निर्धार सभा 

माटे भोजने सभागृह येथे सकाळी ११ वा.बैठक; प्राथमिक शिक्षक समिती तर्फे आयोजन

संगमेश्वर दि. २६ ( प्रतिनिधी ):- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (RTE ACT 2009) नुसार वस्तीपासून १ कि.मी.च्या आत इयत्ता १ ली ते ५ वी चे शिक्षण व ३ कि.मी. च्या आत इयत्ता ८ वी पर्यंतचे शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. मात्र संदर्भ क्र.१ १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास बालकाच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येणार आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी उद्या देवरुख येथील माटे भोजने सभागृहात सकाळी ११ वा. एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला संगमेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य, सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी, सर्व मुख्याध्यापक व सहशिक्षक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा संगमेश्वर यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील बहुसंख्य शाळां मध्ये इ.१ ली ते ५ वी इयत्ता असणा-या शाळांमध्ये एक नियमित शिक्षक तर इ. १ ली ते ७ वी / ८ वी च्या शाळांमध्ये दोन नियमित शिक्षक व एखादा कंत्राटी शिक्षक कार्यरत राहतील. परिणामी शाळा आहे, पण पुरेशा शिक्षकांअभावी शिक्षण नाही अशी परिस्थिती उद्भवू शकते. यासंदर्भात साकल्याने विचार करुन मार्ग काढणे आवश्यक आहे.

याकरिता शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी ठीक ११.०० वा शंकरशेठ माटे व चंद्रकांत भोजने व कै. लक्ष्मीबाई खेतल सभागृह देवरुख येथे संगमेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य, सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व मुख्याध्यापक व सहशिक्षक यांची संयुक्त सभा आयोजित केली आहे. तरी सदर सभेसाठी आपण उपस्थित रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे .

सभेपुढील विषय :- १) दि.१३/१२/२०२५ रोजी कुणबी भवन, देवरुख येथे झालेल्या सभेचा वृत्तांत कथन करणे.२) दि.१५/०३/२०२४ रोजीच्या संचमान्यता शासननिर्णयाची माहिती देणे.३) जिल्हा परिषद शाळांतील शिक्षण बचाव संघर्ष समिती स्थापन करणे.४) जिल्हा परिषद शाळांतील शिक्षण बचाव लढयाची पुढील दिशा ठरविणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button