क्रीडारत्नागिरी

१३ व १४ डिसेंबरला ९ ते १४ वयोगटातील मुलांसाठी विशेष कबड्डी प्रशिक्षण शिबिर

देवरूख दि. १२ (सुरेश सप्रे) :- सचिंद्र आग्रे फाउंडेशन (रजि.) आणि जय भवानी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ते १४ वयोगटातील मुलांसाठी विशेष कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कर्ली फाटा येथे करण्यात आले आहे.

शनिवार १३ ते रविवार १४ डिसें. या कालावधीत सकाळी ०९:०० ते ११:०० सायंकाळी ०४:०० ते ०६:०० यावेळी देवरुख–रत्नागिरी रोड, कर्ली फाटा, येथे घेण्यात येणार आहे.

या शिबिरात संजय कदम, प्रशांत साळुंखे, अक्षय बागुल,  सचिंद्र आयरे, हरीशचंद्र साळुंखे, सुरेश मोरे,  अशोक लोटणकर, सुरेश गोरुवले हे नामांकित. कबड्डीपटू व तज्ज्ञ प्रशिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.

या शिबिरात फिटनेस व खेळ कौशल्य विकास. टीमवर्क आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणे. यावर शिबीर भर दिला जाणार आहे. शिबिर पूर्णपणे विनामूल्य आहे

तरी आपल्या मुलांच्या क्रीडा भविष्यासाठी ही उत्तम संधी आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जय भवानी मंडळाचे अध्यक्ष संजय कदम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button