रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात बँक ऑफ इंडियाच्या ६०व्या शाखेचे गावतळे येथे उद्घाटन

रत्नागिरी दि. ११ :- रत्नागिरी जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ६०व्या शाखेचे गावतळे येथे दि. 09 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या नव्या शाखेचे उद्घाटन बँक ऑफ इंडिया रत्नागिरी झोनचे झोनल मॅनेजर मा. श्री नरेंद्र रघुनाथ देवरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या नवीन शाखेचा मुख्य उद्देश ग्रामीण व अस्पर्शित बँकिंग क्षेत्रांना गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवेशी जोडणे हा असून, वित्तीय सेवा प्रभावीपणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे तसेच नागरिकांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि शाखेच्या पुढील प्रगतीत सहकार्य करावे असेही त्यांनी आवाहन केले.

या उद्घाटन प्रसंगी डेप्युटी झोनल मॅनेजर श्री. अंजनी कुमार सिंह आज़ाद, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, रत्नागिरी श्री. दर्शन दत्ताराम कानसे, बँक ऑफ इंडिया ऑफिर्सस असोशिएशन पुणे युनिटचे महासचिव श्री. प्रमोद शिंदे, अध्यक्ष श्री. अमोल सांगळे, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणे युनिटचे महासचिव श्री. शिरीष राणे, अध्यक्ष श्री. विनोद कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात गावतळेचे उपसरपंच श्री नामदेव यशवंत पवार, पोलीस पाटील श्री विशाल म्हाब्दी, तंटामुक्ती अध्यक्ष श्री वसंत पवार, गावतळे पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, परिसरातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावतळे शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. हरेश बांगरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button