
आज माझ्या संदर्भाने राजहंस हे प्रथितयश प्रकाशन सहकार स्वरूपा हे पुस्तक काढतय प्रसिद्ध लेखक श्री सुमेध वडावाला हे सहकार स्वरूपाचे लेखक आहेत. या पुस्तकाच्या कव्हर पेजच आज अनावरण होतय.
पाहता पाहता माझी साठी आली नव्हे ६० व वर्ष सुरू आहे. या साठ वर्षात वयाच्या २१ वर्षा पासून आज पर्यंत मी काय केल याचा मागोवा घ्यायला मला खूप आवडत.यातूनच सहकार स्वरूपा साकार झालाय.
माझ्या संस्थात्मक जिवनात मी बराच काळ स्थिरावलो ज्या ज्या संस्था मध्ये मी पदावर राहिलो ती प्रत्येक संस्था ऑन टॉप आहे. आणि त्या प्रत्येक संस्थेशी मी प्रदीर्घ काळ जोडलेला आहे. २५ वर्षापेक्षा जास्त काळ जेव्हा आपण संस्थे जवळ सलग्न असतो तेव्हा त्या आस्थापनेच्या यशापयशाशी आपले नाते असते. आपण केलेले प्रयत्न, राबवलेले उपक्रम, संस्थेची निर्माण होणारी प्रतिमा ,जनाधार या सगळ्याच गोष्टी मध्ये आपण सामावलेले असतो. आपण त्या संस्थेवर व्यवस्थेवर संस्कार करतो त्याच ऐक कल्चर निर्माण करतो. हे सगळ करत असताना आपल्याला अनेक अनुभव येतात. अनेक घटनाना ,प्रसंगाना सामोरे जातो. मागोवा घेताना हे प्रसंग आपल्याला आठवतात. असेच प्रसंग अनेक उपक्रम सहकार स्वरूपा च्या माध्यमातून वाचकांसाठी मांडण्याचा प्रयत्न केलाय तस पाहील तर हे आत्म अनुभव कथन आहे. सुमेध वडावाला यांनी ते शब्दबद्ध केलाय.
यातले अनुभव प्रसंग हे प्रत्यक्षातले आहेत. सामान्य व्यक्ती ही संस्थात्मक रचनेत रचनात्मक काम उभारू शकते.गरज असते प्रामाणिक प्रयत्नांची ,आणि उपक्रमशील राहण्याची, विश्वासार्ह वर्तणुकीची ,शिस्तीची.
माझे असेच अनुभव सहकार स्वरुपा चे माध्यमातून शब्दबद्ध झालेत लवकरच हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध असेल. १३ तारखे पासून पुण्यात होणाऱ्या भव्य पुस्तक मेळ्यामध्ये हे पुस्तक प्रदर्शित करण्याचं राजहंस प्रकाशन संस्थे ने नक्की केलाय.
स्वरूपानंद पत संस्था, नगर वाचनालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन, गोवा शिपयार्ड, भाजपा या सगळ्या मधील माझा वावर सहकार स्वरूपात मांडला आहे.
या पुस्तकाच कव्हर आज प्रदर्शित होतय. दोन दिवसात पुस्तक ही उपलब्ध होईल.
माहीत नाही वाचक कसा प्रतिसाद देतील पण मनात पुस्तका बद्दल खूप उत्कंठा आहे राजहंस सारखं नामांकीत प्रकाशन माझ पाहील वाहिल पुस्तक काढतय ह्याचा आनंद तर आहेच पण तेव्ढाच दबावही आहे. तुम्हा सर्वांसाठी सहकार स्वरूपाच कव्हरपेज सामाईक करीत आहे. तुमच्या प्रतिक्रिये साठी आतुर आहे.
ॲड. दीपक पटवर्धन



