आस्थाच्या दिव्यांग प्रेरणा पुरस्काराचा यंदाचा मानकरी ठरला धिरज साठविलकर

रत्नागिरी दि. ९ :- आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेमार्फत जागतिक दिव्यांग दिनी देण्यात येणाऱ्या दिव्यांग प्रेरणा पुरस्काराचे वितरण वैदही रानडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद येथील आयोजित कार्यक्रमात हरहुन्नरी कलाकार श्री. धिरज राजेंद्र साठविलकर यांना प्रदान करण्यात आला.
पाच हजार रुपये चा धनादेश, शाल, श्रीफळ, व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी विचारपिठावर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते, रत्नागिरी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मा.बिराजे मॅडम,शिक्षणाधिकारी श्री. किरण लोहार, ॲड. श्री. धुरत व आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या सचिव सुरेखा पाथरे उपस्थित होत्या. विशेष म्हणजे धिरजने आपल्या पायाने वैदेही रानडे मॅडमचे चित्र काढून त्यांना ते या प्रसंगी भेट दिले.



