रत्नागिरी

देव, घैसास, कीर महाविद्यालयात आविष्कार संशोधनावर व्याख्यान

रत्नागिरी दि. २७ : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आविष्कार संशोधन मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. शुभम पांचाळ यांनी स्पर्धेसंबंधी मार्गदर्शन केले.

आविष्कार रिसर्च कमिटीच्या वतीने “रिसर्च मेथडॉलॉजी, पोस्टर, पीपीटी आणि कम्युनिकेशन स्कील्स या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले. आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा या सत्राचा मुख्य उद्देश होता. या व्याख्यानाला एकूण २४ विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. पांचाळ यांनी संशोधन पद्धतीतील महत्त्वाचे टप्पे जसे की समस्या निवड, साहित्य समीक्षा, डेटा संकलन आणि विश्लेषण यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. आकर्षक व वैज्ञानिकदृष्ट्या योग्य पोस्टर कसे तयार करावे, सुसंगत व प्रभावी पीपीटीमध्ये सामग्री कशी मांडावी, रंगसंगती आणि लेआउटचे महत्त्व, सादरीकरण करताना आवाजाची पट्टी, बॉडी लँग्वेज आणि आत्मविश्वास कसा ठेवावा यासंदर्भातही मौल्यवान मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व्याख्यानादरम्यान उत्साहाने प्रश्न विचारत सक्रिय सहभाग नोंदवला. प्रा. सानिका कीर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button