रत्नगिरी नगर परिषद प्रभाग क्र. ५ मधील विकासासाठी कटिबद्ध: पालकमंत्री ना. उदय सामंत

रत्नागिरी दि. २४ :- रत्नगिरी नगरपरिषद प्रभाग क्र. ५ मधील विकास कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असेल. निवडणुकीनंतर यासंदर्भात पालकमंत्री या नात्याने बैठक घेतली जाईल, असे रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी येथे सांगितले.
रत्नगिरी नगरपरिषद प्रभाग क्र. ५ मधील महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार शिल्पाताई सुर्वे, नगरसेवक पदाचे उमेदवार सौरभ मलुष्टे, पूजा पवार यांच्या प्रचारासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप व क्रांतीनगर येथे आयोजित सभेस शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.

जनतेसाठी अविरत कार्य आपण करत आलो आहे. यापुढेही जनतेच्या कामांची परंपरा आणि विकासाचा निर्धार असाच अखंडपणे सुरूच राहणार आहे. तरी सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देत सेवेची संधी द्यावी असे आवाहन ना. उदय सामंत यांनी केले. प्रभागातील मंगळवार आठवडा बाजाराची जागा विकसित करताना त्याठिकाणी प्रभागातील तरुणासाठी क्रिकेट खेळासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, भाजप जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, बंड्या साळवी, संजय साळवी, भाजपचे सचिन वहाळकर, प्राजक्ता रुमडे, मनिषा बामणे, दीपक पवार, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माता – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



