रत्नागिरी
शृंगारतळीमध्ये उद्या रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रम

शृंगारतळी दि. २२ :- अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी – दक्षिणपीठ नाणीज धाम यांचा प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रम उद्या रविवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणामध्ये संपन्न होणार आहे. तसेच या प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमाचा सर्व गुरुबंधू गुरु भगिनी यांनी लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्या तर्फे करण्यात आले आहे.



