रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग क्रमांक ६ मधून राजीव किर आज अर्ज दाखल करणार

रत्नागिरी दि. १७ :- शिवसेना शिंदे गटातर्फे प्रभाग क्रमांक 6 मधून राजीव किर आज (सोमवार ) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रत्नागिरी भंडारी समाजाचे तालुका प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या किर यांचा समाजात तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये दांडगा संपर्क असून, प्रभागातही त्यांची चांगली ओळख आहे.

आज सकाळी 11 वाजता ते रत्नागिरी नगरपरिषद कार्यालयात अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 6 मधील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button