Uncategorizedरत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषद निवडणूक; नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी

रत्नागिरी दि. १४ :- रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रविवारी रात्री उशीरा ही उमेदवारी जाहीर करण्यात आली.
रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा सुर्वे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न आता सुटला आहे.
शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.



