रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषद निवडणूक अनुषंगाने पोलीस पेट्रोलिंग, रुट मार्च व वाहतूक तपासणी

रत्नागिरी दि. १६ :- नगर परिषद निवडणूक करिता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करणे या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत दि. १४ रोजी रूट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्च हा प्रभाग क्र. 6 व 7, नाचणे पॉवर हाऊस येथून सोमेश्वर किराणा स्टोअर विश्व नगर करलेकर वाडी – आनंद नगर सगुरु बैठक मार्ग – नवीन भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मागील परिसर हिंदू कॉलनी- हिंदू कॉलनी प्रवेशद्वार, माळ नाका येथे घेण्यात आला.

या रुट मार्चमध्ये एक (01) पोलीस अधिकारी, आठ (08) पोलीस अंमलदार, एक (01) आर.सी.पी पथक व तीस (30) पोलीस जवान सहभागी झाले होते.

तसेच दि. १४ रोजी रात्रीच्या वेळेत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नाकाबंदी ठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या वाहन तपासणी दरम्यान एकूण 30 चार चाकी व 18 दुचाकी वाहने तपासण्यात आली. 8 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ₹7,000/- दंड आकारण्यांत आला. 2 (Bullet) बुलेट मोटारसायकल वाहने ही वाहन चालकांनी बदल केलेले (Modified) सायलेन्सर आढळून आल्याने त्यांच्यावर मोटर वाहन कायद्या अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button