देवरूख न. पं.निवडणूक; महाआघाडीने केली १४ उमेदवारांची घोषणा
युतीची घोषणा अद्याप न झाल्याने महायुतीबाबतचा सस्पेन्स कायम

देवरूख दि. १३ (सुरेश सप्रे) :- देवरूख नगरपंचाय निवडणूकीत उमेदवार अर्ज भरण्याची तारीख दोनबाकी असून ही अजून भाजपा-शिवसेन -राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायूती होणार की नाही हा सस्पेंन्स असतानाच उबाठा शिवसेना, राष्ट्रवादीे(शप), काँग्रेस, जनता दल, वंचित आघाडी यांच्या महाआघाडीच्या एकुण १४ उमेदवारांची घोषणा करत बाजी मारली आहे. आज तालुका प्रमुख बंड्या बोरूकर यांनी ६उमेदवारांची नावे जाहीर केली.
भाजपा युतीने पाच वर्षे सत्तेत राहून ही सामान्य नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष न दिल्याने विकासाच्या नावाखाली सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला हाताशी धरून आपलाच विकास करत शहरवासियांचा अपमान करण्याऱ्यांंना आता घरी बसवून शहराच्या सर्वागिण विकासासाठी जनतेने नगराध्यक्षपदासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या बोरूकर यांनी केले.
महाविकास आघाडी तर्फे नगराध्यक्षा पदासाठी उबाठा शिवसेनेच्या सौ. सबुरी तुषार थरवळ तसेच वार्ड नं. ४ मधून महेश पवार (उबाठा) वार्ड नं. ५ सौ. सिध्दी लिंगायत (शप)
वार्ड नं. ६ सौ. शर्मिला अनिल भुवड (काँग्रेस) वार्ड नं. ७ सौ. वैशाली शिंदे (शप) वार्ड नं. ९ अनुष्का टीळेकर वार्ड नं. १० निलेश अरुण भुवड (शप) वार्ड नं. १५ निधि इशत्याक कापडी (उबाठा) यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. आज वार्ड १मधून पुजा मांडवकर, वार्ड २मधून नितीन गोपाळ, वार्ड मधून आनंद (भाई) कुमटेकर, वार्ड १२मधून चंद्रकांत (बाळा) कामेरकर, वार्ड १६ मधून माजी पं.स.उपसभापती व युवा सेनेचे धडाडीचे पदाधिकारी अजित (छोट्या) गवाणकर तर वार्ड १७ साक्षी पर्शराम यांच्या नावे घोषित करण्यात आली. उर्वरित चार उमेदवार उद्यापर्यंत निश्चित करण्यात येणार आहेत.
या नगर पंचायत निवडणूका एकत्रितपणे महा आघाडी म्हणूनच लढण्यासाठी सज्ज असून आमच्यात कोणतेही वाद विवाद नाहीत. उर्वरित उमेदवारांची नावे विजयाच्या निकषावर वर सर्व संमतीने ठरवली जातील. असे बोरुकर यांनी सांगितले..



