रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” जप्त

रत्नागिरी दि. १ :- रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 3 किलो 4 ग्राम वजनाची ₹3,10,30,000/- किंमतीची “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” व एक गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
दिनांक 31/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना एमआयडीसी, रत्नागिरी परिसरात बाफना मोटर्सच्या शेजारी काही इसम “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” विक्रीसाठी एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथे घेऊन येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.
या गोपनीय माहितीच्या आधारे लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, एक पथक तयार करण्यात आले व या पथकाने एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथे बाफना मोटर्स च्या शेजारी सापळा रचला व दिनांक 31/10/2025 रोजी एम.आय.डी.सी रत्नागिरी परिसरात छापा टाकला असता आरोपी इसम 1) रोहित रमेश चव्हाण राहणार आंबेशेत, 2) आसिफ अस्लम मोरस्कर राहणार पिंपरी बुद्रुक चिपळूण व ३) तेजस परशुराम कांबळे राहणार आडरे चिपळूण यांच्या जवळ “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” कोणतीही परवानगी न घेता, विनापरवाना आपले ताब्यात विक्री करण्याचे उद्देशाने बाळगले असताना मिळून आल्याने त्यांच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी इसम 1) रोहित रमेश चव्हाण राहणार आंबेशेत, 2) आसिफ अस्लम मोरस्कर राहणार पिंपरी बुद्रुक चिपळूण व 3) तेजस परशुराम कांबळे राहणार आडरे चिपळूण यांच्या ताब्यातून एकूण 3 किलो 4 ग्राम वजनाची ₹3,10,30,000/- किंमतीची “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” व एक गुन्ह्यात वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई, पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व श्रेणी. पो.ऊ.नि, प्रशांत बोरकर, पो.हेकॉ/301 बाळू पालकर, पो.हेकॉ/306 गणेश सावंत, पो.हेकॉ/1238 प्रवीण खांबे, पो. हेकॉ/1410 सत्यजित दरेकर, चालक पो.कॉ/215 अतुल कांबळे आदी पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी केलेली आहे.



