विल्ये रत्नागिरी येथे विश्वरत्न बाबासाहेबांना अभिवादन

विल्ये दि. १० :- विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी स्थानिक/मुंबई, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, तसेच मानकाआप्पा समिती, मिलींद जलसा कला निकेतन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबोधनी भीम गीतांच्या कार्यक्रमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
कवी बबन जी कांबळे, विजय तुकाराम कांबळे, शिवराम कांबळे, इत्यादी कवींची भीमगीते तसेच लोक शाहीर वामन दादा कर्डक यांच्या अप्रतिम गाजलेल्या भीम गीतांच्या गायनाचा कार्यक्रम झाला, रात्री १२ वाजता, बुद्ध पुजापाठ घेऊन अभिवादन करण्यात आले.
दिनांक ६ डिसेंबर रोजी, सकाळी १०:३० वाजता अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेचे सूत्रसंचालन नरेश कांबळे यांनी अप्रतिमरित्या केले.अभिवादन सभेला बाबासाहेबांनी दिलेले समता, स्वातंत्र्य, बंधू, एकता या मुल्यांवर आधारित लोकशाही बाबासाहेबांनी आपल्याला दिली परंतु ती प्रबळ करण्यासाठी आपले योगदान काय? आपण लोकशाही समजून घेण्यासाठी कमी पडलो त्यासाठी प्रत्येक भारतवासियांनी बाबासाहेबांचे विचार समजून घेणे महत्वाचे असे मत वक्त्यांनी मांडले. बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, राष्ट्र स्तरीय योगदानाबद्दल कु.तुषार कांबळे, नरेश कांबळे,अरविंद कांबळे, कु.नील कांबळे तसेच अध्यक्षीय भाषणात सुवेज कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच नरेश कांबळे यांनी स्वाभिमान गहाण टाकू नका अशा विचारावर आधारित काव्यरचना सादर केली. या कार्यक्रमावेळी मिलिंद जलसा कला निकेतन मंडळाचे आजी- माजी कलाकार, गायक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.



