मंडणगड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन
सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

रत्नागिरी, दि. ११ :- मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उद्या रविवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री डाॕ उदय सामंत, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती माधव जामदार, गृह (शहरे), महसूल, ग्राम विकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे देखील या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथे समारंभ आयोजित करण्यात आला आहे.



