रत्नागिरी

अंत्रवली गावातील मानकरी व ग्रामस्थांचा शिंदे सेनेत प्रवेश

संगमेश्वर दि. २९ ( प्रतिनिधी ):- अंत्रवली गावातील मानकरी व ग्रामस्थांनी बुधवारी राजेंद्र महाडीक यांच्या निवासस्थानी शिंदे सेनेत प्रवेश केला. अंत्रवली गावातील मानकरी सुधीर सुर्वे यांच्यासह गावकर सुरेश मालप, गावकर शांताराम माईन, आत्माराम माईन, अनंत सुर्वे, तुकाराम माईन, काशिनाथ माईन, राजेश गुडेकर, मंगेश सुर्वे, चंद्रशेखर सुर्वे तसेच इतर ग्रामस्थांनी शिवसेने (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.

कसबा संगमेश्वर येथील राजेंद्र महाडिक यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हा पक्षप्रवेश पार पडला. आण्णा महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिंदे सेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी सर्वांनी सांगितले.यावेळी बोलताना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवार सौ. रचना महाडिक यांना एकदिलाने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेणार असल्याची ग्वाही दिली. या प्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यात शिंदे सेनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button