रत्नागिरी

विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून ७२ तासांच्या संप

रत्नागिरी दि. १० :- आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून ७२ तासांच्या संपाला सुरुवात केली आहे. रत्नागिरी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी हा संप सुरू केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणचे ३७१ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या संपात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

1) महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुनर्रचनेच्या (Resteructuring) प्रस्तावाची अंमलबजावणी तात्काळ थांबविणे.

2) महावितरण कंपनीचे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास तीव्र विरोध.

3) समांतर विज वितरण परवाना देण्यास कायम तीव्र विरोध.

4) विज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांना राज्य शासनाने मंजूर केलेली पेंशन योजना त्वरीत लागू करणे.

5) दि. 07 मे 2021 चा शासन आदेश त्वरीत सुधारित करून मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करणे.

6) तिन्ही वीज कंपन्यातील वेतन गट 1 ते 4 स्तरावरील संवर्गनिहाय रिक्त पदे पदोन्नती, सरळसेवा भरती व अंतर्गत भरतीद्वारे एम.एस.ई. बी. होल्डिंग कंपनीच्या मूळ BR प्रमाणे भरणे.

7) कंत्राटी/बह्यस्त्रोत कर्मचारी यांना नोकरीत समाविष्ट करण्याबाबत उपाययोजना करणे.

8) महानिर्मिती कंपनीचे जल विद्युत प्रकल्पाचे BOT तत्वावर खाजगीकरण करण्यास तीव्र विरोध.

9) महापारेशन कंपनीमधील रु.200 कोटीच्या वरील प्रकल्प TBCB माध्यमातून भांडवलदारांना देण्यास विरोध व कंपनीमधील कंपनीचा शेअर मार्केटमध्ये IPO च्या माध्यमातून लिस्टिंग करण्यास तीव्र विरोध.

कृती समितीने आपली भूमिका पुनः अधोरेखित करताना, ” तूर्त रिस्ट्रक्चरिंग तात्काळ थांबवा !!” आमच्या सूचना समाविष्ठ करून चर्चेतून पुढील निर्णय घेण्यात यावा, असे स्पष्ट केले आहे.

यावेळी वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष कॉ. सलाऊददीन नाकाडे, महिला आघाडी सहसचिव श्रीमती फडके मॅडम, केंद्रीय कार्यकारणी सदस्य राम भाटकर, विभागिय सचिव अभिजीत कीर, महापारेषणचे विभागिय सचिव कॉ. शरद मयेकर, इंजिनिअर असोशिएशनचे (SEA) थी, कुलकर्णी साहेब, सर्कल’ अध्यक्ष व श्री. कमलेश घाडगे विभागिय सेक्रेटरी, मागासवर्गीय संघटनेचे सर्कल सचिव रविंद्र कांबळे, विभागिय अध्यक्ष निलेश हांडे,सल्लागार किरण कांबळे, इंटकचे विभागिय सचिव श्री. योगेश रहाटे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button