मराठी भाषेचा सन्मान राखणे, तिचा वारसा जपणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी – ना. उदय सामंत

मुंबई दि. ७ :- मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे. ही ओळख टिकवण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आणि साहित्यिक या दोघांचीही जबाबदारी समान आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने आयोजित “मराठीतील गाजलेल्या अभिजात आणि सुश्राव्य गीत गायन कार्यक्रमाला” राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या साहित्य, इतिहास आणि भाषेच्या वैभवाची गौरवशाली परंपरा अनुभवण्याची संधी मिळाली. कार्यक्रमात मराठी भाषेच्या प्रवासाचा आणि तिच्या “अभिजात” दर्जापर्यंतच्या वाटचालीचा गौरव करण्यात आला. साहित्यिकांच्या अथक परिश्रमांमुळे आणि ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांच्या ऐतिहासिक शक्तीमुळे आज आपल्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.
मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे. ही ओळख टिकवण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आणि साहित्यिक या दोघांचीही जबाबदारी समान आहे.
मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि शिकण्यासाठी आता विशेष “मराठी शिकण्याचे ॲप” सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, दरवर्षी किमान ५,००० अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचा संकल्प आहे. तसेच, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुन्हा अनुवाद समिती स्थापन करून मराठी साहित्याचा जागतिक स्तरावर प्रसार केला जाणार आहे.
मराठी भाषेचा सन्मान राखणे, तिचा वारसा जपणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे यावेळी ना. उदय सामंत यांनी म्हटले.
या प्रसंगी आजचे उत्सवमूर्ती आणि सत्कारमूर्ती आदरणीय विश्वास पाटील, सहकारी मंत्री आणि मित्र आदरणीय आशिषजी जैसवाल, आदरणीय वसंत डहाके, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, तसेच संचालक श्यामकांत देवरे आदी मान्यवर, साहित्यिक उपस्थित होते.



