रत्नागिरी

कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण अच्युत नेरुरकर यांचे निधन

रत्नागिरी दि. ७ :- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सोबत संस्था वाढविण्यात महत्वाची भूमिका असणारे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण अच्युत नेरुरकर यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.

मागील अनेक वर्षे रत्नागिरीच्या साहित्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात कार्यरत राहून अरुण नेरुरकर यांनी सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. अत्यंत मृदू व नम्र स्वभाव यामुळे त्यांनी अनेक संस्था आणि व्यक्ती यांच्यासोबत काम केले आहे. म्हणून त्यांचे आपल्याला सोडून जाणे ही अत्यंत दुःखद घटना आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज सांयकाळी ०४:०० वाजता त्यांच्या रत्नागिरी येथील राहत्या घरातून निघणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button