जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा घेत मच्छिमार बांधवांशी साधला संवाद

रत्नागिरी दि. २३- रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेला बळकटी देण्यासाठी व स्थानिक मच्छीमार तसेच नेपाळी खलाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २२ सप्टेंबर रोजी रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी मिरकरवाडा जेट्टी येथे भेट दिली व सर्वच्छीमार बांधव यांच्याशी संवाद साधला व नेपाळी खलाशी यांची माहिती घेतली. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील किनाऱ्यावरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी किनारपट्टीवर असणाऱ्या बोटींची तपासणी व पाहणी देखील केली.
यावेळी पोलिस पोलिस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी स्वत: रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील नौका विभागातील जवानांसोबत सागरी गस्त करत समुद्र किनाऱ्याची पाहणी केली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी, पोलिस उपअधीक्षक (मुख्या.) श्रीमती. राधिका फडके, शहर पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील, पोलिस निरीक्षक जिल्हा सुरक्षा शाखा श्री. नितीन भोईर तसेच पोलिस दलातील नौका विभागाचे पोलिस अंमलदार उपस्थित होते.
याप्रसंगी पोलिस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी किनारपट्टीवरील अवैध हालचालींना आळा घालण्यासाठी पोलीस दल व मच्छीमार यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच समुद्रात कुठलीही संशयास्पद हालचाल आढळ्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळविण्याचे आवाहन केले.



