कोतवडे बौध्दवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका!

रत्नागिरी दि. २३- रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे बौध्दवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्याच्या सहाय्याने आज मंगळवारी सुखरूप बाहेर काढले व त्याची सुखरूप सुटका केली. याकामी वनविभागाला ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
कोतवडे येथील बौद्धवाडीमधील सार्वजनिक विहिरीमध्ये बिबट्या वन्य प्राणी पडलेला असल्याची माहिती सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोतवडे गावचे सरपंच श्री. संतोष बारगोडे यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनी वरून माहीती दिली, त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन रेस्क्यू टीम,पिंजरा व आवश्यक त्या साहित्यासह घटनास्थळी येऊन पाहणी केली. सदरची विहीर ही ग्रामपंचायत घर नंबर 422 च्या मागील बाजूस भर वस्तीमध्ये आहे. विहीर ही आयताकृती असुन 3 फूट उंचीचा चिरेबंदी कठडा असलेली आहे, विहिरीची लांबी सुमारे 10 फूट, रुंदी 4फूटआणि खोली 40 फूट आहे. पाण्याची पातळी 10 ते 12 फुटावर असून बिबट्या हा वन्य प्राणी विहिरीमध्ये उतरण्यासाठी असलेल्या पायरीवर पाण्यात बसलेलाअसल्याचे दिसून आले.
त्यानंतर तात्काळ पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला व बिबट्याला पिंजऱ्यामध्ये 15 मिनिटांचे आतच सुरक्षित पिंजऱ्यामध्ये घेण्यात आला. त्यानंतर मा पशुधन विकास अधिकारी कोतवडे श्री अभिजीत भगवान कसाळकर यांच्याकडून बिबट्याची वैद्यकिय तपासणी करून घेतली.तो सुरक्षित असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले, तसेच सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे ९ ते १० वर्षे वयाचा आहे. सदर विहिरीवर शेडनेट टाकलेले असून भक्षाचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज स्थानिक परिस्थितीनुसार दिसुन येत आहे. सदर रेस्क्यूची कार्यवाही ही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर कामगिरीसाठी श्री प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री न्हानू गावडे वनपाल पाली,श्री विराज संसारे वनरक्षक रत्नागिरी श्रीमती शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी, श्री शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे तसेच पोलीस अधिकारी श्री मनोज पावसकर, श्री. वाडकर , होमगार्ड श्री. मनोज मोहिते गावचे सरपंच, श्री संतोष बारगोडे गावचे उपसरपंच स्वप्निल प्रकाश पड्याळ पोलीस पाटील सौ पूर्वा पवार, सौ वैष्णवी माने, सौ दीया कांबळे ग्रामपंचायत सदस्य, श्री रवींद्र हरी कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष, श्री अनंत तुकाराम फणसोपकर, श्री मयुरेश मंगेश कांबळे, सुनील गोपाळ कांबळे, सुहास मोहिते, साहिल कांबळे, तसेच गावातील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले वनाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले सदरचा बिबट्या हा सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी रत्नागिरी गिरीजा देसाई यांनी केले आहे.



