क्रीडारत्नागिरी

श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी आयोजित कॅरम स्पर्धेत रियाज अ. अली याला दुहेरी मुकुट

महिला गटात आकांक्षा कदम, किशोरी गटात निधी सप्रे, किशोर गटात आदित्य देसाई, कुमार गटात ओम पारकर विजयी

रत्नागिरी दि. २७ ऑगस्ट : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी आयोजित रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीच्या रियाज अ. अली याने दुहेरी मुकुट पटकावला. तसेच महिला गटात आकांक्षा कदम हिने राजापूरच्या निधी सप्रे हिच्यावर विजय मिळवून महिला गटात विजेते पद पटकाविले.

या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हातून सर्व गटातून सुमारे ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू रत्नागिरीच्या रियाज अ. अली याने रत्नागिरीचा राष्ट्रीय खेळाडू अभिषेक चव्हाण याच्यावर २०-१९, २०-१७ अशा संघर्ष पूर्ण सामन्यात मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

जिल्हा मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या रियाज अकबर अली व अभिषेक चव्हाण या जोडीने राहुल भस्मे व मुक्तानंद वरवडेकर या जोडीचा २५-१०, २५-१३ असा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुष वयस्कर गटात देवरूखच्या राहुल भस्मेने गणेश पाटणकर यांचा संघर्षपूर्ण लढतीत २५-००, २५-०१ तर महिला एकेरी गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा कदम हिने राजापूरच्या निधी सप्रे हिचा १२-२५, २५-०९, १३-२५ असा पराभव करून अनुक्रमे पुरुष वयस्कर व महिला गटाचे विजेतेपद पटकाविले.

किशोर गट (मुले) या गटात आदित्य देसाई (लांजा) याने आराध्य शेट्ये याचा १५-००, १७-०९ तर कुमार गट (मुले) या गटात ओम पारकर (रत्नागिरी) याने आर्यन राऊत (जैतापूर) याचा १३-०७, ११-०२ असा पराभव करून त्या त्या गटाचे विजेतेपद पटकाविले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला मंडळाचे अध्यक्ष श्री. राजन मलुष्टे, कार्यवाह श्री. मकरंद खातू, सहाय्यक कार्यवाह श्री. निलेश मलुष्टे, श्री. योगेश मलुष्टे, श्री. मिलींद दळी, श्री. नितीन लिमये (खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), सदस्य श्री. विवेक देसाई, श्री. विनय गांगण, श्री. सचिन बंदरकर व श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे

१. पुरुष एकेरी: अंतिम सामना रियाज अ. अली वि. वि. अभिषेक चव्हाण – २०-१९, २०-१७

उपांत्य सामना १ अभिषेक चव्हाण वि. वि. अनिल गांधी-२५-०, २५-०

उपांत्य सामना २ रियाज अ. अली वि. वि. दिनेश पारकर २५-१, १५-१९, २५-१९

उप-उपांत्य सामना १ अभिषेक चव्हाण वि. वि. संजय कोंडविलकर – २५-६, २५-०

अनिल गांधी वि. वि. ओम पारकर २५-१०,२५-१५ उप-उपांत्य सामना २

दिनेश पारकर वि. वि. योगेश कोंडविलकर २५-१०, २५-१० उप-उपांत्य सामना ३

उप-उपांत्य सामना ४ रियाज अ. अली वि. वि. मुझफ्फर पांजरी २५-१०, १५-२०, २५-१५

२. पुरुष दुहेरी : अंतिम सामना अभिषेक चव्हाण / रियाज अ. अली वि. वि. राहुल भस्मे /मुक्तानंद वरवडेकर – २५-१०, २५-१३

उपांत्य सामना १ अभिषेक चव्हाण / रियाज अ. अली वि. वि. दिनेश पारकर / ओंकार मोरे-२५, २५-५, २५-११

उपांत्य सामना २- राहुल भस्मे / मुक्तानंद वरवडेकर वि. वि. संजय कोंडविलकर / योगेश कोंडविलकर-१२-१८, १८-१२.२२-२०

३. पुरुष वयस्कर गट: अंतिम सामना राहुल भस्मे वि. वि. गणेश पाटणकर – २५-०, २५-०१

उपांत्य सामना – १ – राहुल भस्मे वि. वि. दामोदर घाणेकर – २५-०, २५-०७

उपांत्य सामना-२ गणेश पाटणकर वि. वि. संतोष जोगळेकर २५-१०, १०-२५, २५-८

४. महिला गटः अंतिम सामना आकांक्षा कदम वि. वि. निधी सप्रे १२-२५, २५-९, १३-२५

उपांत्य सामना – १ निधी सप्रे वि. वि. स्वरा मोहिरे २५-१०, १५-२५.२५-१५

उपांत्य सामना-२ आकांक्षा कदम वि. वि. मधुरा बाणे २५-००, २५-००

५. १४ वर्षाखालील मुले : अंतिम सामना आदित्य देसाई वि. वि. आराध्य शेट्ये – १५-००, १७-०९

उपांत्य सामना १ आदित्य देसाई वि. वि. आकर्ष गुरव १५-०४, २०-००

उपपांत्य सामना – २ आराध्य शेट्ये वि. वि. आराध्य मांडवकर १३-०२,१४-००

६. १८ वर्षाखालील मुले : अंतिम सामना ओम पारकर वि. वि. आर्यन राऊत १३-०७, ११-०२

उपांत्य सामना १ ओम पारकर वि. वि. आदित्य देसाई १४-०९,१६-०८

उपपांत्य सामना २ आर्यन राऊत वि. वि. तनिष कोंडविलकर-१६-१०, १७-१०

७. १८ वर्षाखालील मुली :

अंतिम सामना निधी सप्रे वि. वि. स्वरा मोहिरे १०-०९, १६-१०

उपांत्य सामना १ निधी सप्रे वि. वि. अनन्या चवंडे १०-०५, १५-०८

उपपांत्य सामना – २- स्वरा मोहिरे वि. वि. सान्वी देसाई-१५-००, २०-००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button