गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान येथे एक्का उत्सव

गणपतीपुळे दि. २५ ऑगस्ट (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान येथे एक्का उत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने सोमवारी 24 ऑगस्ट रोजी आलेल्या दुसऱ्या श्रावण सोमवारी साजरा करण्यात आला.
गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री च्या प्रदक्षिणा मार्गावर असणाऱ्या शुंडास्थान येथे प्रतिवर्षाप्रमाणे एक्का उत्सव साजरा करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही या शुंडा स्थानाच्या ठिकाणी सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी08:30 ते सायंकाळी 08:30 पर्यंत बारा तासाचा एक्का उत्सव मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला.
यावेळी हरिनामाचा गजर करण्यात आला. या एक्का उत्सवाचे आयोजन शिवप्रेमी मित्र मंडळ केदारवाडी गणपतीपुळे यांच्या वतीने करण्यात आले.या एक्का उत्सवामध्ये गणपतीपुळे, मालगुंड, निवेंडी, भंडारपुळे, नेवरे आदी परिसरातील भजनी मंडळांनी मोठ्या उत्साहाने व श्रद्धेने सहभाग घेतला.



