रत्नागिरी

जिल्हा परिषद सदस्य, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रचे रत्नागिरी विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी, दि. २३ ऑगस्ट :- रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जावकर प्लाझा, जयस्तंभ येथे ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पालकमंत्री नामदार उदय सामंत  यांना तातडीच्या कामानिमित्त चाकण येथे जावे लागल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली. त्यांच्या अनुपस्थितीत हा उद्घाटन सोहळा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश भगवान सांबरे साहेब तसेच *lपंचायत समिती सदस्य श्री. नेताजी पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक ११ वाजता संपन्न झाला.

यावेळी उपस्थित मान्यवर –

या प्रसंगी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सचिव श्री. केदार चव्हाण, रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री. मंदार नैकर, लांजा तालुका अध्यक्ष श्री. योगेश पांचाळ, श्री. सचिन गोताड, श्री. साहिल गोरे, श्री. दीपक सांबरे, श्री. बंटी महाकाळ, श्री. कैलास आडवीरकर, श्री. राज फुटक, श्री. मंदार मांडवकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. विलास उर्फ बंधू वारीशे, पाऊस जिल्हा परिषद गट उपविभाग प्रमुख श्री. प्रवीण शिंदे, पंचायत समिती सदस्य श्री. नामदेवजी कोकरे, पावस विभाग समन्वयक श्री. अजय तेंडुलकर, श्री. निलेश गजने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शुभचिंतक मोठ्या संख्येने हजर होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी ॲड. महेंद्र मांडवकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच “या कार्यालयात जनतेच्या प्रश्नांसाठी ॲड. महेंद्र मांडवकर यांच्यासोबत आम्ही देखील खांद्याला खांदा लावून काम करू” असे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले.

मोफत सेवा –

या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना शासकीय योजनांचे फॉर्म भरणे, जाती, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर दाखल्यांसाठी अर्ज करणे, अर्जांचा पाठपुरावा करणे आणि जिजाऊ संस्थेच्या शैक्षणिक व आरोग्य उपक्रमांचे मार्गदर्शन या सर्व सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत.

खेड्यापाड्यातून येणाऱ्या सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात होणारा त्रास कमी व्हावा, हाच या कार्यालयामागील मुख्य उद्देश असल्याचे ॲड. महेंद्र मांडवकर यांनी यावेळी सांगितले.

पत्ता : जावकर प्लाझा, जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, E-Wing, पहिला मजला, गाळा नं. १ व २, रत्नागिरी | *संपर्क : ९४२३२९२५७५*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button