जि.प.शाळा रानपाट येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

तरवळ दि. १७ ऑगस्ट (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील जि. प. शाळा रानपाट येथे ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री. भितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
ध्वजारोहणाचे संपूर्ण संचलन शाळेचे विद्यार्थी कु. हर्ष मनोज रावणंग आणि कु. मृणाली प्रदीप गोनबरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
सर्व प्रथम ‘ वंदेमातरम्’ हे राष्ट्रिय गीत गावून ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गायले गेले. त्यानंतर राज्यगीत व ध्वजगीत गाण्यात आले. तसेच “हा देश माझा….” हे समूह गीत गाण्यात आले. यासाठी श्रेया मोरे, स्वरा रावणंग, खुशी मोरे, कल्याणी गोनबरे आणि विधी गोनबरे यांनी गायन केले. त्यांना हार्मोनियम साथ श्री. भितळे सर यांनी, तर ढोलकी आणि इतर साथ विद्यार्थी कु. वेदांत सुनील गोनबरे, ओम संतोष मोरे आणि दत्तप्रसाद उदय बेनकर यांनी दिली.
या संगीतमय कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड प्रमाणे संगीतमय संचलन सादर केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी कवायत प्रात्यक्षिके सादर केली. इयत्ता पहिली ते तिसरी विद्यार्थ्यांनी झुंबा डान्स, तसेच मानवी मनोरे आणि विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा उन्नत्ती उत्तम गोनबरे, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती प्रमुख सदस्य बाळकृष्ण गोनबरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मयूर गोनबरे, सदस्य श्रीपाद मुकादम, गावचे पोलीस पाटील सुनील गोनबरे, ग्रामपंचायत प्रशासक अंकुश कांबळे यांच्यासह सर्व समित्यांचे सदस्य, ग्रामस्थ व पालक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुहास भितळे, सहकारी शिक्षक प्रदीप पवार, मनोज जाधव, संचिता भितळे आणि सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.


