इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे सुयश

रत्नागिरी दि. १६ ऑगस्ट : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील सहा विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. ओम बाणे हा विद्यार्थी जिल्ह्यात सहावा व दुर्वांक प्रभूकेळुसकर हा जिल्ह्यात पंधरावा आला आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परुळेकर कौन्सिल सदस्य सौ. शुभांगी वायकूळ, मुख्याध्यापक विनोद नारकर आणि पालक प्रतिनिधींच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आला.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ओम नंदकुमार बाणे (६ वा), दुर्वांक प्रवीण प्रभूकेळुसकर (१५ वा), श्रीयांश राकेश पवार (४१ वा), ग्रंथा सुरज सनगरे (४६ वी), श्रीशांत प्रशांत दिवाडकर (५७ वा) आणि आराध्या गुरुदास खुळे (९३ वी) यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम, गीताली शिवलकर, उदय आरेकर, शिवानी मोहिते, संपदा सावंत यांनी मार्गदर्शन केले.
याशिवाय गुणवत्ता शोध परीक्षेत शाळेच्या सोळा विद्यार्थ्यांनी यश मिळवले. गुणवत्ता शोध परीक्षेतील विद्यार्थ्यांची नावे व गुण या क्रमाने- इयत्ता चौथी- ओम नंदकुमार बाण (राज्य यादीत क्रमांक १३), श्रीयांश राकेश पवार, श्रीशांत प्रशांत दिवाडकर, दुर्वांक प्रवीण प्रभुकेळुसकर, इयत्ता तिसरी- चिन्मय अभिजीत काटदरे (राज्य यादीत क्रमांक ९), अवनी सुशील पेटकर, अवनी अभिजीत ढाणे, आरोही संतोष कदम, इयत्ता दुसरी- ओवी ऋषिकेश जाधव (राज्य यादीत क्रमांक १५), निल राजेश भातडे, निषाद ऋषिकेश मेहेंदळे, मीरा संकेत महाडिक, काव्या राजेश भगवे, इयत्ता पहिली- दुर्वांक परेश बापार्डेकर, नीरजा अभिजीत सहस्त्रबुद्धे, आणि अनन्या अनिकेत जोशी. या विद्यार्थ्यांना उदय आरेकर, शिवानी मोहिते, संपदा सावंत आणि महेश साळुंके, नेहा भातडे, ज्योती शेंडगे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.



