रत्नागिरी

१९ जुलै रोजी रत्नागिरीतील खंडाळा दीक्षाभूमी बुद्ध विहार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

विल्ये दि. १७ जुलै (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व शिक्षण समिती यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बावीस खेडी बौद्धजन संघटनेच्या दीक्षाभूमी बुद्ध विहार वाटद खंडाळा येथे आयोजित करण्यात आला आहे.

सालाबाद प्रमाणे यावर्षीही बावीस खेडी बौद्धजन संघटनेच्या कार्यक्षेत्रातील १९ गाव शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ” गुणगौरव सोहळा व विद्यार्थी करिअर मार्गदर्शक” रत्नागिरी आरास अकॅडमी संस्थेचे प्रशिक्षक अँड.राकेश सर्वे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या समारंभाला बौद्धजन पंचायत समितीचे तालुका उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे,सह सचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, शिक्षण समिती अध्यक्ष जयवंत कदम गुरुजी, सचिव काशिनाथ तांबे गुरुजी तसेच महिला मंडळ अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, सचिव दिया कांबळे, युवक कार्यकर्ते विलास कांबळे, जेष्ठ कार्यकर्ते दिनकर कांबळे, रविकांत पवार गुरुजी, बावीस खेडी बौद्धजन संघटनेचे अध्यक्ष सुनील उर्फ भाई जाधव व सहकारी पदाधिकारी, महिला, गाव शाखा पदाधिकारी, बौद्धाचार्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी या समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पवार, सेक्रेटरी सुहास कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button