रत्नागिरी

युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण गुरुकुल विभागामध्ये राष्ट्रीय चिकित्सक दिवस अनोख्या पद्धतीने साजरा! 

गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी घेतला प्रकृती परीक्षण आणि वैद्यांच्या मुलाखतीचा अनुभव

संगमेश्वर दि. ६ ( प्रतिनिधी ):- परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण गुरुकुल विभागामध्ये राष्ट्रीय चिकित्सक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे प्रकृती परीक्षण उपक्रमा अंतर्गत आरोग्य तपासणी संपन्न झाली. चिपळूण मधील लायन्स क्लब व लिओ क्लब यांच्या सहकार्याने गुरुकुल मधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

राष्ट्रीय चिकित्सक दिवस या निमित्ताने गुरुकुल शाळा समिती अध्यक्षा सौ सारिका भावे मॅडम तसेच संस्था पदाधिकारी श्री तुषार गोखले सर , प्रशालेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे सर,विभाग प्रमुख मंगेश मोने सर यांनी उपस्थित मान्यवराचे पुष्प,भेट वस्तू देऊन स्वागत केले . यावेळी उपस्थित डॉक्टर प्राची हरवंदे यांचा सन्मान करण्यात आला. स्वागताच्या वेळी मनोगतातून लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास परांजपे यांनी मी या शाळेचा माजी विद्यार्थी असून मला त्याचा अभिमान आहे. शाळेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करायला आवडेल असे ते म्हणाले. या वेळी त्यांच्या समवेत रमेश रेळेकर, राजीव कांबळी, शाम परांजपे, पंकज ओसवाल, लिओ प्रेसिडेंट सुयश कदम आदी उपस्थित होते.

आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर म्हणून प्राची हरवंदे मॅडम, डॉक्टर शेखर भुवड साहेब तसेच त्यांची टीम उपस्थित होती .उपस्थित डॉक्टरांनी मुलांचे आरोग्य तपासणी केली. त्यांना आरोग्य सुदृढतेसाठी सल्ला दिला. पौष्टिक आहार घेण्याविषयी मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे गुरुकुलातील उपक्रमांचे वेगळेपण जपत इयत्ता सहावी सातवी आणि आठवी मधील निवडक विद्यार्थ्यांच्या एका गटाने चिपळूण मधील प्रसिद्ध वैद्य सौ राजश्रीताई सोमण यांच्या दवाखान्याला भेट देऊन त्यांच्या आरोग्य सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांच्यासोबतच्या गप्पांमधून त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील आजपर्यंतचा प्रवास, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि त्यांच्या साधेपणाच्या कार्यशाळेतून मिळणारा आनंद प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून समजून घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button