रत्नागिरी

गणपतीपुळे समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या पाचही पर्यटकांचे मृतदेह सापडले

गणपतीपुळे दि. २१ :- येथील समुद्रात पर्यटनासाठी आलेले आणि पाण्यात बुडून बेपत्ता झालेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचही तरुणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. पोलीस यंत्रणा, कोस्टगार्ड, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर राबवलेल्या शोधमोहिमेनंतर पाचही जणांचे मृतदेह हाती आले असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गणपतीपुळे परिसरात आणि बिडकीन गावावर शोककळा पसरली आहे.

मृतांची नावे:

१. आदित्य संतोष राऊत (वय २२ वर्ष)
२. अनिकेत बंडू हिवराळे (वय २० वर्ष)
३. आनंद राजू नरवडे (वय २० वर्ष)
४. प्रेम दीपक आदमाने (वय १९ वर्ष)
५. यश रामेश्वर कांबळे (वय १९ वर्ष)
(सर्व राहणार: बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर)

​पाचही जण बेपत्ता झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कस्टम आणि स्थानिक मच्छिमारांच्या बोटींच्या साहाय्याने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली होती. अखेर अथक प्रयत्नांनंतर पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

पर्यटकांना महत्त्वाचे आवाहन:

या मोठ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन पर्यटकांनी समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरू नये. जीवितहानी टाळण्यासाठी दुरूनच समुद्राचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button