चिपळूण येथे मराठा क्रांती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

चिपळूण दि. ६ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज, ६ जून रोजी चिपळूण येथे मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी क्रांती प्रतिष्ठानच्या कार्यालयात तसेच चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवगर्जना, जयघोष आणि शिवरायांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी स्वराज्याच्या विचारांचा जागर केला.
या कार्यक्रमात मराठा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महादेव उर्फ बाळा कदम, सचिव श्री. राजेश कदम, विश्वस्त श्री. प्रमोद राव कदम, सौ. निर्मला जाधव, शिवानी भोसले संध्या घाडगे, रमेश उर्फ बाळू शिंदे, प्रदीप साळुंखे, सुनील चव्हाण, विक्रांत सावंत, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष श्री. सुधीर दादा भोसले, सेवादल चे तुळशी दादा पवार, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष स्नेहल चव्हाण विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याणाचा आदर्श पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.


