लांजा येथील काजू फॅक्टरीमधील चोरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उघडकीस
दोन आरोपी ताब्यात, सुमारे ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

रत्नागिरी दि. ६ :- लांजा येथील काजू फॅक्टरीमधील चोरी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून, या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेकडून सुमारे ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक 28/05/2026 रोजी 18.00 ते दिनांक 29/05/2026 रोजी 9.20 या कालावधीत फिर्यादी यांचे झिमण्स कश्यु पॉईट कोत्रेवाडी लांजा ही काजू फॅक्टरी फोडून काजू गर चोरुन नेल्यावरुन लांजा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 112/2026 भा.न्या.सं.चे कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना गोपनीय माहीतीचे आधारे आरोपीत इसम 1) शाहरुख मुराद साखरकर, वय 30 वर्षे, रा.भाटये नवानगर ता. जि.रत्नागिरी 2) वजीद मोहम्मद अझीझ खान, वय 41 वर्षे, रा. बजार रोड, शिया मस्जीद समोर, बांद्रा पश्चिम मुंबई सध्या रा. भाटये, जामा मस्जीद शेजारी, ता.जि. रत्नागिरी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. नमुद आरोपीत यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे.
सदर आरोपींकडून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले एक चारचाकी वाहन असा एकूण 9,41,879 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास लांजा पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दतात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व श्रे.पो.उनि. श्री. संदीप ओगले, स.पो.फौ. 1188 सुभाष भागणे, पो.हवा. 909 विजय आंबेकर, पो.हवा. 1067 अमित कदम, पो.हवा. 1407 दिपराज पाटील, चा. पोशी. 215 अतुल कांबळे या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


