रत्नागिरी

देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालय पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

रत्नागिरी दि. ६ : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, वनस्पती विभाग, भूगोल विभाग, जलजिविका संस्था, लोकमान्य सोसायटी आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत फुलझाडे व फळझाडांची लागवड करून परिसर हरित करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

जलजिविका संस्थेचे जिल्हा समन्वयक चिन्मय दामले, सौ. समृद्धी सनगरे, लोकमान्य सोसायटीचे अर्पित शेलार व भूषण डोंगरे इनरव्हील क्लबच्या प्रज्ञा गांधी, ऋचा गांधी, सुवर्णा चौधरी आणि श्रद्धा सावंत, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. मिथिला वाडेकर, वनस्पती विभाग प्रमुख प्रा. विनय कलमकर, भूगोल विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड आदी उपस्थित होत्या.

महाविद्यालयाच्या परीसरात विविध प्रकारची फुलझाडे व फळझाडांची लागवड करण्यात आली. मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि हरित परिसराची निर्मिती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button