रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची तात्काळ कारवाई; हर्णे येथील जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात ८ जणांना अटक

दापोली दि. २९ :- हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात घडलेल्या गंभीर मारहाणीच्या घटनेप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी व जखमी हे दोघे गोवा किल्ला येथे फेरफटका मारण्यासाठी गेले असता आटोपी क्रमांक 1 व 2 हे त्यांच्या इतर साथीदारांसह किल्ला परिसरात उपस्थित होते. यावेळी “काल घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर का टाकला?” या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व जखमी यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली तसेच हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी तेथे पडलेली लोखंडी शिग वापरून दोघांवर जीवघेणा हल्ला केला. तसेच आरोपींसोबत असलेल्या 10-15 मुलांनी देखील फिर्यादी व जखमी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादी व जखमी यांना डोके, तोंड, हात, पाय व पाठीवर गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे उपचार सुरु आहेत. संबंधित साक्षीदारांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 109/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 52, 351 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जेन अस्लम हुनेरकर, वय 22 वर्षे, मुफीज जावेद सोलकर, वय 23 वर्षे, सलाह हसन कोडविलकर, वय 19 वर्षे, नबिल निसार काझी, वय 19 वर्षे, जैब ताजुद्दीन जमादार, वय २६ वर्षे, एक विधीसंघर्षित बालक, हर्षद अझीम हुनेरकर, वय 25 वर्षे, नाईफ आरिफ श्रीवर्धनकर, वय 19 वर्षे, सर्व आरोपी हर्णे बंदर मोहल्ला, ता. दापोली, जि. रत्नागिरी येथील राहणारे आहेत.

गुन्ह्यातील आरोपी क्रमांक । ते 5 यांना दिनांक 28/05/2026 रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दिनांक 01/06/2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासादरम्यान आरोपी जेन अस्लम हुनेटकर याच्याकडे चौकशी केली असता आरोपी हर्षद अझीम हुनेरकर व नाईफ आरिफ श्रीवर्धनकर यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही दिनांक 29/05/2026 रोजी अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यात एका विधीसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून या गुन्ह्यामध्ये अन्य आरोपींचा सहभाग आहे का या बाबत गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस ठाणेमार्फत सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग श्री. शैलेश सणस, पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरस्कर (दापोली पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे (स्था.गु.अ.शा., रत्नागिरी) व पथक तसेच दापोली पोलीस ठाण्याच्या स.पो.नि., श्रीमती पूजा हिरेमठ, म. पो.हवा / रुपाली ढोले, पो.उ.नि. श्री. राजकुमार यादव, पो.शि. / रुपेश दिडे, पो.उ.नि. श्री. हेमराज निर्मळ, पो.शि./ दिलीप नवाले, पो.उ.नि. श्री. महेश पाटील, पो.शि. / पंकज पवार, श्रेणी. पो.उ.नि. श्री. मोरे, श्रेणी. पो.उ.नि. श्री. ओगले, स.पो. फौ/शिवाजी बांगट, स.पो.फौ / सुभाष भागणे, सपो/ अशोक गायकवाड, पो.हवा / नितीन डोमणे, पो.हवा / संतोष सडकर, पो.हवा / योगेश नार्वेकर, पो. हवा / मोहिते, चा.पो.शि./ सुखदेव नरवडे या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button