रत्नागिरी

आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी मनुज जिंदल

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी, दि. २० :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम 18 मे 2026 रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 18 मे 2026 पासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 जून 2026 पर्यंत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. सार्वजनिक व खासगी मालमत्तेवर फलक, बॅनर लावून मालमत्ता विरुपीत केल्यास अगर तशी तक्रार आल्यास मालमत्ता विरुपीकरण कायदा 1995 चे कलम 2 नुसार दंडनीय कारवाई करावी लागेल असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेशित केले आहे.

या निवडणुकीसाठी सोमवार 25 मे 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार 1 जून 2026 असेल. मंगळवार 2 जून 2026 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून गुरुवार 4 जून 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदान गुरूवार 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार 22 जून 2026 रोजी करण्यात येईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया गुरूवार, 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button