रत्नागिरी

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वर-कसबा येथे रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे मानवंदना

रत्नागिरी, दि. १५  : ३६९ व्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संगमेश्वर-कसबा येथील महाराजांच्या स्मारकास रत्नागिरी पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे शासकीय मानवंदना देण्यात आली. पोलीस दलातर्फे अशा प्रकारे मानवंदना देण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे

कसबा याठिकाणी पार पडलेल्या या सोहळ्यात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पोलीस बँड पथकाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना दिली.

संभाजी महाराजांच्या अजोड शौर्याला, पराक्रमाला आणि स्वराज्य रक्षणाच्या विचारांना ही मानवंदना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button