रत्नागिरीसामाजिक

परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित गुरुकुल विभागाचे शत प्रतिशत यश!

संगमेश्वर दि. ११ ( प्रतिनिधी ):- गेल्या शंभर वर्षांहून जास्त कालावधी चिपळूण मध्ये ज्ञान दानाचे पवित्र कार्य करत असलेल्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणचा २०१९ सुरुवात झालेला एक अभिनव आणि वेगळा शैक्षणिक प्रयोग म्हणजे पंचकोशाधारीत गुरुकुल विभाग! गेली सहा वर्षे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व घडणीसाठी अनेक विशेष आणि वेगळे उपक्रम आयोजित करणाऱ्या गुरुकुल विभागातील इयत्ता दहावीची यावर्षी दुसरी तुकडी माध्यमिक शालांत परीक्षेसाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रविष्ठ झाली.

नियमित अकरा तास गुरुकुल मध्ये उपस्थित राहून परीक्षेसाठीचा पाठ्यक्रमाचा अभ्यास करता करता त्या अभ्यासाशीच जोडलेल्या विविध उपक्रम, प्रकल्प, अभ्यास कौशल्य, स्वयंअध्ययन कौशल्य, अभ्यास पूरक शिबिरे, विषय निहाय जास्तीचे मार्गदर्शन, सकाळ अभ्यासिका आणि सराव परीक्षा अशा चाकोरी बाहेरील मार्गांचा अवलंब करत २४ विद्यार्थी गुरुकुल मधून दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते.

गुरुकुल विभागातील एकूण सात विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून गुरुकुलाची मान उंचावली.

यापैकी रुद्र धन्वंतर वळंजू( 97.20)याने प्रथम क्रमांक तर शर्वरी विजय सावंत (96.20) हिने द्वितीय क्रमांक आणि गंधार सुशांत नाईक (95.20 )याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांसोबतच कु.ईश्वरी ओमप्रकाश राजे (95.00), अथर्व नागराज वळंजू (93.40) , श्रीश मिलिंद तांबे (93.20), अवधूत दत्ताराम लाड (92.80) यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले.

गुरुकुल विभागातील गंधार नाईक हा युनायटेड प्रशालेतून परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 247 विद्यार्थ्यांमधून संस्कृत आणि गणित या दोन्ही विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकमेव विद्यार्थी ठरला. तर श्रीश मिलिंद तांबे या विद्यार्थ्याने मराठी विषयात सर्वाधिक 97 गुण मिळवून संपूर्ण युनायटेड मध्ये 247 विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

गुरुकुल मधील शिवम श्रीकृष्ण चव्हाण 75.20, मेघ श्रीराम देवळेकर 83.80,सोहम नामदेव डोंगरे 81.00, ओजस सतीश कुंटे 89.80, वेद रुपेश पवार 88.20, सत्यम उत्तम सपकाळ86.20,पार्थ सुनील सावर्डेकर 76.20, मुग्धा अरुण जोशी 78.00, सोनाली संतोष कदम 82.00,श्रेया केशव खाडे 77.00, भक्ती दत्ताराम लाड 87.40, सहिस्ता सचिन पवार 86.20,मैत्रेयी पराग पुरोहित 86.20 या विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता मिळवली

तर शर्विल श्रीकृष्ण चव्हाण (73.70),अक्षय दर्शन परब (73.40) आणि ईशान संदीप शिगवण (74.60) हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि विघ्नेश प्रशांत पवार हा विद्यार्थी 47.60% गुण मिळवून उत्तीर्ण झाला.

24 विद्यार्थ्यांपैकी वीस विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह म्हणजे 75 टक्क्यांहून जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले तर तीन विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि एका विद्यार्थ्याने उत्तीर्ण श्रेणी प्राप्त करत यश मिळवले.

व्यक्तीपरिचय, मुलाखती, मातृभूमी परीक्षा शिबिरे, वर्षभर साजरे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा संगणक, स्पर्धा विज्ञान, संबंधित स्पर्धा आणि अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमधून मनापासून हिरीरीने सहभागी होत गुरुकुलातील शिकलेल्या अनेक कौशल्यांचा उपयोग करून घेत स्वतःचा अभ्यास स्वतः करत गुरुकुलातील अध्ययन अध्यापन पद्धती, स्वयं अध्ययन आणि जास्तीचे सराव यामुळे हे विद्यार्थी कोणत्याही खाजगी शिकवणीचा आधार न घेता हे यश मिळवू शकले हे गुरुकुल चे वेगळेपण आणि विशेष!

या सर्व विद्यार्थ्यांच्या सुयशा बद्दल सौ. सारिका भावे (शाळा समिती अध्यक्ष गुरुकुल विभाग), सर्व पदाधिकारी परशुराम एज्युकेशन सोसायटी, युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण, गुरुकुल विभाग आणि पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button