रत्नागिरी

कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एस. टी.च्या कार्ड नोंदणीचे आयोजन

रत्नागिरी दि. ८ :-  कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एस. टी.च्या कार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या १२ ते ७५ वयापर्यन्तचे महिलांना निम्मे व ७५ वर्षावरील महिलांना निःशुक्ल्क तसेच पुरुषांसाठी ६५ नंतर निम्मे शुल्क व ७५ नंतर मोफत प्रवास करता येतो. त्यासाठी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड दाखवावे लागते. आता त्याऐवजी एन. सी. एम. सी. कार्ड अनिवार्य केले आहे. या कार्डाचे वितरण करण्यासाठी मे. इम्बिक्स कॅश टेक्नॉलॉजी या कंपनीची नेमणूक एस. टी. महामंडळाने केली आहे.

कुवारबाव परिसरातील नागरिकांना एस. टी. डेपोत न जाता हे कार्ड सुलभरीत्या कुवारबाव येथे मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ कुवारबावचे विद्यमाने दि. ७ जुलै रोजी सकाळी १० ते रात्रों ८.३० पर्यंत वरील कंपनी मार्फत २२५ जणांची नोंदणी करणेत आली.

याकामी संघाचे अध्यक्ष श्री. आंब्रे, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम, सचिव श्री. सुरेश शेलार सदस्य श्री. श्यामसुंदर सावंत, श्री. प्रकाश बोरकर, श्रीमती घाणेकर, शुभांगी भावे, सुवर्णा चव्हाण, वृषाली शेट्ये यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यानंतर कंपनीचे श्री. दीपक तराळे यांचा संघातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पं देऊन सत्कार करणेत आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button