रत्नागिरी

मुंबई – गोवा महामार्गासह घाट रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी

माजी आमदार विनय नातू यांची मागणी

देवरुख दि. ७ सप्टेंबर (सुरेश सप्रे) :-  कोकणातील घाट रस्त्यावर दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये मुंबई-गोवा रस्त्यासह घाटात येणारा – जाणारा वाहतूक व्यवस्थेकरिता व रस्त्याच्या सुधारणाकरिता विविध बैठका पुढील काही दिवसात होतील. त्यामध्ये मुख्यतः अवजड वाहतूक या मुंबई-गोवा रस्त्यावरती बंद केली जाईल व रस्त्यावरील खड्डे व माणगाव- इंदापूर – कोलाड येथील होणारा वाहतूक अडथळा याबाबत उपाययोजना केल्या जातील. परंतु त्याच बरोबर ताम्हणी घाट, वरंधाघाट व महाबळेश्वर घाट हे रायगड जिल्ह्याला जोडणारे तीनही घाट सुस्थितीत राहावेत याकरिता स्वतंत्र उपाययोजना केली पाहिजे.

तसेच कुंभार्ली घाट, आंबा घाट व अणुस्कुरा घाट, रघूवीर घाट हे चार घाट रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारे मुख्य घाट रस्ते, खड्डे मुक्त व व्यवस्थित व वाहतूक अडथळा न होता असणारे राहण्याकरताची तातडीने उपयोजना करणे आवश्यक आहे.

याकरिता मुंबई-गोवा महामार्गासोबतच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व घाट रस्त्यांच्या कामांचाही आढावा घेतला जावा व हे सर्व घाट रस्ते खड्डे मुक्त व सुरक्षित राहण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी आमदार विनय नातू यांनी केली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री यांना दिली आहेत.

विनय नातू यांच्या मागणीची दखल घेवून यावर तातडीने उपाययोजना करण्यात येवून चाकरमान्यांना दिलासा मिळेल का? याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागून राहिले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button