रत्नागिरीत पोलिसांची गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई

रत्नागिरी दि. ३० :- रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने व कोकण नगर चौकीचे अधिकारी व अंमलदार यांचेकडून गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी शहरात गावठी हातभट्टी दारु तयार करतात अशी माहिती मिळत होती. त्या अनुषंगाने रत्नागिरी शहरात गावठी हातभट्टी दारु विरोधी कारवाई करण्याचे सुचना जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री.बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी/अंमलदार यांना देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे रोज निहाय गावठी हातभट्टी दारु तयार करणायांबाबत गोपनिय माहिती प्राप्त करण्याचे काम चालु होते.
त्याप्रमाणे आज दिनांक ३०/०४/२०२६ रोजी सकाळी ०७.०० वा. चे दरम्यान रत्नागिरी शहर पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक तानाजी पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर शिंदे व पोलीस अंमलदार हे शहर परीसरात पेट्रोलिंग दरम्यान रत्नागिरी शिळ मिरजोळे परिसरात पेट्रोलिंग करताना स्वरुपानंद सुभाष कदम वय ३० वर्षे रा. शिळ कदमवाडी, ता.जि. रत्नागिरी हा त्याठिकाणी दिसुन आल्याने त्यांला पोलीस स्टाफने जागीच थांबवुन त्याचेकडे चौकशी करुन सदर ठिकाणाची पाहाणी केली असता संशयीत इसम हा गावठी हातभट्टी दारु तयार करीत असताना मिळुन आला आरोपीत नामे स्वरुपानंद सुभाष कदम वय ३० वर्षे रा. शिळ कदमवाडी, ता. जि. रत्नागिरी यांचे ताबे कब्जात एकुण ८९,०५०/- रु किंमतीचा गुळ नवसागर मिश्रीत तयार केलेले कुजके रसायन व गावठी हातभट्टी दारु हा मुद्देमाल गैरकायदा स्वतःचे जवळ बाळगले स्थितीत मिळुन आला म्हणुन त्यांचे विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल केलेला असुन सदर मुद्देमाल हा जप्त व नाश करण्यात आला असुन गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. बाबुराव महामुनी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, तानाजी पवार, सहा. पोलीस निरीक्षक, सागर शिंदे, पोलीस उप निरीक्षक, दिपक साळवी, सपोफौ/७०८, राजेंद्र सावंत, सपोफौ/११४१, अमिता पाटील, मपोहेकॉ/१४००, उमेश पवार, पोहेकॉ/१३७२, भालचंद्र मयेकर, पोहेकॉ/७५४, अमित पालवे, पोकॉ/४८४, निलेश शिंगवे, पोकॉ/७८ या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.


