
रत्नागिरी दि. २७ :- दि. ८ ते १० मे रोजी कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र यांच्यामार्फत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2026 चे आयोजन नाशिक, महाराष्ट्र येथे करण्यात आले आहे.
सदर राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी कराटे असोसिएशन रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी या संघटने मार्फत जिल्हास्तरीय निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
सदर निवड चाचणी मध्ये 06 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंतच्या वयोगटातील मुला-मुलींनी सहभागी व्हावे असे आव्हान रत्नागिरी जिल्हा संघटने मार्फत करण्यात येत आहे
कराटे इंडिया ऑर्गनायझेशन व कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कराटे प्रशिक्षकांनी आपल्या खेळाडूंना जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणीमध्ये सहभागी करावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष / सचिव यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धा स्थळ:
जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी
स्पर्धा वेळ: सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे
दिनांक :- 30 एप्रिल 2026*
संपर्क क्रमांक : 9422053283 /9422053928 9422372297


