रत्नागिरी

ग्रुप ग्रामपंचायत बोंडे नारशिंगे येथे ३ डिसेंबर ला मोफत नेत्र तपासणी शिबीर व आधार कार्ड अपडेशन कॅम्प चे आयोजन

तरवळ दि. २ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील बोंडे नारशिंगे येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत बोंडे नारशिंगे व दिवाळी बेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नेत्र तपासणी शिबिरामध्ये अत्याधुनिक मशिन्स च्या सहायाने डोळे तपासले जाणार आहेत, तसेच या द्वारे मोतीबिंदू तपासणी देखील केली जाणार आहे. तसेच ज्या रुग्णांना डोळ्या संबंधित विकार आहेत त्यांना योग्य उपचार सुद्धा केले जाणार आहेत. याच शिबिरात आधार कार्ड काढणे, अपडेट करणे, आधार मोबाईल ला लिंक करणे या सारखी आधारकार्ड शी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी आधारकार्ड कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी १० ते ६ या वेळेत सुरू राहणार आहे.

या मोफत नेत्र तपासणी शिबीर व आधारकार्ड संबंधित असलेल्या कामांचा सर्व ग्रामस्थांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत बोंडे नारशिंगे चे सरपंच गणेश कांबळे, तसेच उपसरपंच महेश देसाई तसेच ग्रामविकास अधिकारी राहुल सोनकांबळे यांनी केले आहे.

सदरचे शिबीर ग्रुप ग्रामपंचायत बोंडे नारशिंगे येथील उपसरपंच महेश देसाई यांच्या प्रयत्नाने भरविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button