
देवरूख दि. २ :- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तालुका कृषि अधिकारी कार्यालय संगमेश्वर, गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमेश्वर, ॲग्रोस्टार शेतकरी कंपनी देवरुख या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने “अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिबिर व कृषी प्रेरणासत्र गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आले आहे
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली चे कुलगुरू डॉ. संजय भावे स्वतः संगमेश्वर तालुक्यात उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
“कोकणातील सुपीक माती, सेंद्रिय परंपरा आणि शास्त्रीय मार्गदर्शन एकत्र आले तर शेतकऱ्यांचा नफा दुप्पट होऊ शकतो याच विषयावर औषधी शेतीतून कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ”या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
“अश्वगंधा” — कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णपीक!
कमी खर्च – कमी पाणी – जास्त नफा, हेक्टरी उत्पन्न: 6 ते 8 क्विंटल, आजचा भाव: ₹250 ते ₹450 प्रति किलो, हेक्टरी निव्वळ नफा: ₹1,75,000 पर्यंत, कालावधी: फक्त 5–6 महिने, थेट कंपनी खरेदीची हमी
“जिवा ऑरगॅनिक कंपनी (कॅनडा)” व ॲग्रोस्टार शेतकरी कंपनी, देवरुख-संगमेश्वर यांच्या सहकार्याने प्रत्येक शेतकऱ्याचा माल त्या दिवशीच्या बाजारभावाने विकत घेतला जाईल. बियाणे, सर्टिफिकेशन, प्रशिक्षणाचा खर्च – कंपनीकडून पूर्णपणे मोफत! कोणतेही छुपे शुल्क नाही. फक्त सेंद्रिय लागवड – 100% पारदर्शक व्यवहार. शासकीय अनुदानाची जोड!तालुका कृषि अधिकारी कार्यालय, संगमेश्वर यांच्यामार्फत ₹60,000/- प्रती हेक्टर जास्तीत जास्त ₹1,20,000/- प्रती शेतकरी अनुदान मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी त्वरित संपर्क करा :- ओंकार बेलोसे — 9823456781, निखिल कोळवणकर— 9420907388, रोहित पाटील (ॲग्रोस्टार)— 7744051006प्रणय भायनाक (कृषि विस्तार अधिकारी) — 9823832863 / 9370526572
प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणे अनिवार्य.
पहिल्या 100 शेतकऱ्यांना विनामूल्य कृषि दैनंदिनी व विशेष सवलत!
प्रशिक्षण वर्गातच सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक माहिती दिली जाईल.
फोनद्वारे माहिती न देता सर्व माहिती प्रत्यक्ष प्रशिक्षणात दिली जाईल.



