रत्नागिरी

देवरुख पोलीसांची धडक कामगिरी;  दरोड्यातील आरोपींना २ तासात अटक

देवरुख दि. ९ (सुरेश सप्रे) :-  रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर दख:न ते आंबा घाटात गाडी अडवून गाडीतून उतरवत चाकुचा धाक दाखवत दमदाटी व शिवीगाळ करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याप्रकरणातील आरोपींना देवरुख पोलिसांनी दोन तासात पाच आरोपींना जेरबंद केले असून तीन जण फरार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

याबाबतची पोलिसांनी अटक केली दीलेल्या माहीतीनुसार प्रथमेश तानाजी दळवी रा. शाहुवाडी, कोल्हापुर हे यांच्या ताब्यातील बोलेरो गाडी मधून वेतोशी ता.जि.रत्नागिरी येथुन सायंकाळी ६.३० वा.सुमारास ०१ म्हैस भरुन रत्नागिरी ते कोल्हापुर असा शिराळा, सांगली येथे घेऊन जात असताना आंबाघाट, दख्खन येथे आले वेळी पाठीमागील काचेवर पांडुरंग लिहिलेली थार गाडी क्रमांक एम.एच.०८/२७६७ व भारत सरकार असा स्टीकर असलेली इनोव्हा गाडी क्रमांक एम.एच.०८/ २०९९ मध्ये आलेल्या ०८ अनोळखी इसमाने फिर्यादीचे गाडीचे पुढे व मागे लावुन फिर्यादीला गाडीतुन खाली उतरवुन मारहाण व शिवीगाळी करुन तसेच चाकुचा धाक दाखवुन इन्व्होवा गाडीमध्ये जबरदस्तीने कोबुन गंद्रे पेट्रोलपंप साखरपा येथे आणुन अर्ध्या वाटेत उतरवून पोबारा केला. व दमदाटी करुन पोलीसांना काही सांगिलेस तर याद राख अशी धमकी दिली व त्यांचेकडे ५०,०००/- रु ची मागणी करुन त्यांचेकडील गाडीचे केबिनमध्ये ठेवलेले २५०००/- रु जबरदस्तीने काढुन घेतले व पोलीसात तक्रार केली तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.

फिर्यादी यांनी साखरपा पोलिस स्थानकात दीलेवर गांर्भिय लक्षात घेत तातडीने तपास करून पाच आरोपींच्या मुसक्या आवळत अटक केली.

देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजि नं.४७/२०२६ भा.न्या. संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०९ (४),३१० (१),२०४, ११२, १४०, (२), १२७(२),११५ (२), ३५१(४) अन्वये दि.०९/०४/२०२६ रोजी ८ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नितीन बगाटे, पोलीस अधिक्षक रत्नागिरी. व बी.बी.महामुनी अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा. व उदय झावरे, पोलीस निरिक्षक, देवरुख यांनी तपास पथके तयार करुन गुन्ह्यातील अटक आरोपी फरहान रशिद मुल्ला वय ४२, रा. कोकण नगर ता.जि.रत्नागिरी, २) प्रथमेश सचिन भाटकर, रा. गोळप ता.जि.रत्नागिरी,वय २४ ३) सर्वेश सुभाष किर वय २२ रा. सोमेश्वर किरबाग ता.जि.रत्नागिरी., ४) धर्मलिंगम विजयकुमार नाडर, वय-२६ वर्षे रा.कुवारबांव रत्नागिरी, ५) भुषण बिपेंद्र सावंत, वय-२६ वर्षे, रा. मि-या भारतीय शिपीयार्ड जवळ ता.जि.रत्नागिरी. अश्या एकुण ०५ आरोपींना तात्काळ अटक केलेली आहे. उर्वरीत फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

सदरची कामगिरी नितीन बगाटे पोलीस अधिक्षक रत्नागिरी, बी.बी.महामुनी अपर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा सुरेश भट कदम यांचे मार्गदर्शनाखाली उदय झावरे, पोलीस निरिक्षक, पोउनि प्रमोद वाघाटे सपोफौ/११६७ शांताराम पेंदेरे, पोहेकॉ / ४९ प्रशांत मसुरकर, पोहेकॉ/१४३० सचिन कामेरकर, पोहेकॉ/१०२७ नितीन जाधव, पोकॉ/७३५ प्रशांत साळुंखे, पोकों/७९३ अमर सुतार, मपाकॉ/६८६ रेश्मा चव्हाण यांनी कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button