कृषीरत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा बँक महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक : अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे 

बँकेला यावर्षी ३२ कोटी ९ लाख इतका नक्त नफा!

रत्नागिरी दि. ८ :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी नक्त नफा ३२ कोटी ९ लाख इतका झाला आहे. बँकेमध्ये आर्थिक शिस्त आणताना ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बँकेचा राहिला आहे. त्यामुळे आज जिल्हा बँकेची स्थिती भक्कम असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये २ क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारुपाला आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी या बँकेची स्थापना २४ मे १९५७ मध्ये झाली. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा हा मंडणगड ते बांदा म्हणजे सध्याचा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा असा एकत्रित होता. बँकेचे भागभांडवल ₹८७,८५५/- होते. त्याचप्रमाणे शासनाने ₹१.०० लाख भागभांडवल मंजूर केले. त्यानंतर बँकेची आर्थिक प्रगती सुरु असतानाच सदर बँकेचे विभाजन होऊन रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे दोन जिल्हे झाल्यावर रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्वतंत्र बँक म्हणून आरटीजी /बीएनके / १४२७/दिनांक १ जुलै १९८३ ने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी अशी नोंदणी झाली आहे.

तसेच सदर बँकेला बँकींग व्यवसाय करणेसाठी रिझर्व्ह बँकेकडील आरपीसीडी/बीओएम/६९-सी दिनांक ७ जुलै १९९५ ने सन २०११-१२ दि.२० डिसेंबर २०११ ने मान्यता मिळालेली आहे. बँकेचे कार्यक्षेत्र मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या ९ तालुक्यातून ७५ शाखा, १ विस्तार कक्ष व प्रधान कार्यालय असे विस्तारलेले आहे. बँकेच्या बहुतांश शाखा या ग्रामीण भागातील तळागाळात कार्यरत आहेत.

बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अनेक अडचणीवर मात करुन बँकेने आपले वेगळे स्थान महाराष्ट्र राज्यात व सहकार क्षेत्रात निर्माण केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये २ क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारुपाला आली आहे. कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेची सुत्रे हाती घेतल्यानंतर आज जवळजवळ अठरा ते एकोणीस वर्षांचा कालावधी झाला आहे.

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सन २००७ मध्ये बँकेची सुत्रे हाती घेतली त्यावेळी बँक तोट्यात होती व डबाघाईला आली होती. साखर कारखान्यांची कर्जे, इतर मोठी कर्जे, अन्य योजनांची कर्जे व सोसायट्यांची कर्जे ही मोठ्या प्रमाणात थकित झाली होती. त्यामुळे एनपीए भरमसाठ वाढला होता. नाबार्ड, आरबीआय व सहकार खाते यांनी बँकेच्या कर्ज व्यवहारावर मर्यादा आणली होती. बँकेचे सोनेतारण कर्ज वगळता अन्य सर्व प्रकारच्या कर्ज वितरणावर स्थगिती आणली होती. त्यावेळी भागभांडवल ₹२१.५९कोटी, निधी ₹४१.९४कोटी, ठेवी ₹४८७.५२ कोटी, कर्जे ₹३०७.५५ कोटी, एकूण व्यवसाय ₹७९५.०७ कोटी, संचित तोटा ₹९.१४ कोटी ढोबळ एनपीए १९.८३% व नक्त एनपीए १३.६१% अशी बँकेची अत्यंत हलाकीची आर्थिक परिस्थिती होती.

बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी यांच्या सहाय्याने हळूहळू काम सुरु केले आणि अनेक योजना अभ्यासपूर्व राबविल्या. आज बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. बँकेमध्ये आर्थिक शिस्त लावून बँकेला एका विशिष्ट पातळीवर नेवून ठेवले आहे. बँकेमध्ये अनेक बदल व सुधारणा केल्या त्यामध्ये सन २०१२ मध्ये बँकेकरीता “कोअर बँकिंग प्रणाली” स्विकारणेत आली. त्यामुळे ग्राहकांना जलद सेवा उपलब्ध झाली. तसेच बँकेमध्ये आयटी विभाग सुरु करुन उपलब्ध करुन दिल्या. ग्राहकांना तात्काळ कर्जे मिळावे म्हणून शाखाधिकारी व क्षेत्रिय अधिकारी यांना शाखा ATM.NEFT.RTGS.SMS Alert, POS Transaction यांसारख्या अत्याधुनिक सेवा ग्राहकांकरीता पातळीवर विविध प्रकारच्या कर्ज मंजरीचे अधिकार तसेच तालुकास्तरीय कर्ज व आढावा उपसमिती सभेस तालुका पातळीवर कर्ज मंजीचे अधिकार दिल्यामुळे ग्राहकांना तात्काळ कर्ज मिळू लागले.

सन २०२३-२४ मध्ये बँकेने सहकारी संस्थांना ३०% लाभांश दिला. सहकारी संस्थांना ३०% लाभांश देणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे.

बँकेच्या एकूण २६ स्वमालकीची शाखा कार्यालये आहेत. त्यापैकी २२ शाखा कार्यालये कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दितील आहेत.

बँकेला मिळालेल्या महाराष्ट्र शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार २०१५-१६ व महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार २०१७-१८ या प्रस्कारांसह एकूण २० प्रस्कार मिळाले असून सन २०२५-२६ मध्ये इ प्लस इंटेलेक्च्युअल मिडीया, नवी मुंबई सन २०२५- “बेस्ट बँक ऑफ द इअर व इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर पुरस्कार” हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. बँकेचे ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार, भागधारक यांचा बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अढळ विश्वास आहे. सलग १५ वर्षे ऑडिट वर्ग “अ”, सलग १४ वर्षे नक्त एनपीए ०% सलग १८ वर्षे नफ्यात असलेली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक हि प्रगतीपथावर असून अत्यंत भक्कम आर्थिक स्थितीत आहे.

बँकेची ठळक वैशिष्ट्ये –

बँकेच्या जिल्ह्यात एकूण ७६ शाखा असून प्रधान कार्यालयासह तालुकास्तरावरील व तालुक्यातील इतर शाखा मिळून २६ शाखा स्वमालकीचे जागेमध्ये कार्यान्वित केल्या आहेत.

बँकेने ग्राहकांसाठी जिल्ह्यात १९ ठिकाणी ATM सेंटर कार्यान्वित केली असून, त्याद्वारे ग्राहकांना पैसे काढणे, बॅलन्स चेक करणे, मिनी स्टेटमेंट जनरेट करणे इ. सुविधा देणेत येत आहेत.

बँकेने जिल्ह्यातील बँक ग्राहकांसाठी मोबाईल ए.टी.एम. व्हॅन सुविधा कार्यान्वित केली आहे. चिपळूण-गुहागर – संगमेश्वर, खेड – मंडणगड दापोली व रत्नागिरी लांजा राजापूर या तालुक्यांमधील शेतकरी, व्यापारी, ग्राहक व अन्य नागरिकांना बँकींग सेवा पुरविणेसाठी ३ मोबाईल ए.टी.एम. व्हॅन कार्यरत आहेत. सदर मोबाईल ए.टी.एम. व्हॅन जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील जनसमुदायाचे ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून त्याद्वारे बँकेच्या विविध ठेवी व कर्जयोजनांबाबत ग्राहकांना माहिती देण्यात येते.

यापुर्वी बँकेने खालीलप्रमाणे डिजिटल बँकींग सेवा पुरविल्या असून, त्यामुळे ग्राहकांना जलद व तत्पर सेवा देण्यात येत आहे.

UPI, IMPS, QR Code, RTGS / NEFT, ATM/POS / ECOM, SMS / Missed Call Alert, ECS, DBT, Mobile Banking, QR Sound Box

बँकेमार्फत प्राथमिक विकास संस्थांचे पदाधिकारी व सचिव यांचेकरीता वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करुन नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण आयोजित केले जाते. सन २०२५-२६ या सहकारी वर्षात माहे मे २०२५ मध्ये प्राथमिक शेती संस्थांच्या १०५ मा. अध्यक्ष महोदयांकरीताकरीता तसेच माहे जानेवारी २०२६ मध्ये जिल्ह्यातील ३७ विकास संस्थांचे पदाधिकारी यांना तसेच माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये जिल्ह्यातील ३५ संस्थांचे सचिवांना शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्था, वाशी, नवी मुंबई यांचेमार्फत निवासी प्रशिक्षण कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण, ता. चिपळूण येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.

प्रगतशील सह संस्थांना भेटी देण्याकरीता अभ्यासदौऱ्याचे आयोजन करणेत येते. याकरीता प्रत्येक तालुक्याला तसेच बँकेमार्फत प्राथमिक विकास संस्थांचे सचिव व पदाधिकारी यांचेकरीता महाराष्ट्र राज्यातील दरवर्षी ₹१.०० लाखापर्यंत बँकेमार्फत आर्थिक सहाय्य करणेत येते. सन २०२५-२६ या काळात जिल्ह्यातील संस्थांचे १४६ सचिव व पदाधिकारी सदर अभ्यासदौऱ्यात सहभागी झाले आहेत.

साध्य करणेसाठी व शेती सहकारी संस्थांचे खाजगी सचिवांना प्रोत्साहीत करणेसाठी दि.०१.०४.२०१६ पासून प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे कर्जव्यवहारामध्ये ठेवीमध्ये तसेच कर्जवसुलीमध्ये समाधानकारक प्रगती संस्थांचे सचिवांना संस्थांचा कर्जव्यवहार व कर्जवसुलीचे निकष ठरवून दरमहा संस्थेने केलेला कर्जव्यवहार विचारांत घेऊन ₹१,५००/- ते ₹५,०००/- आर्थिक मदत दिली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे व महापूरामूळे नुकसान झालेल्या शेतकरी, छोटेमोठे उद्योजक व शैक्षणिक संस्था यांना रु. २५.०० लाखापर्यंत ५ % कर्जपुरवठा करणेत आला आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शेती सहकारी संस्थांना रु. ५.०० लाख कमाल मर्यादेपर्यंत संस्था कार्यालय इमारत बांधकामाकरीता सन २०२५-२६ या सहकारी वर्षात ३ संस्थांना ₹१३,००,०००/- इतकी आर्थिक मदत देणेत आली.

बँकेतर्फे १०० संगणक संच जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळांना देणेचे आश्वासन देणेत आले होते. त्याची पुर्तता करुन १०० संगणक संच जिल्हा परिषदेला सुपुर्द करणेत आले आहेत. तसेच बँकेमार्फत जिल्ह्यातील ३० जि.प. शाळांना सोलार युनिट संच देणेचा निर्णय झालेला आहे.

प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे सबलीकरणासाठी राबविणेत आलेल्या विशेष योजना

अनिष्ट तफावतीतील प्राथमिक शेती सहकारी संस्थांना अनिष्ट तफावतीतून बाहेर काढण्यासाठी अनिष्ठ तफावतीचे ५०% रक्कम संस्थेने भागभांडवल रूपाने जमा केल्याने, सन २०२५-२६ या सहकारी वर्षात २ संस्थांना ₹३,१३,३६५/- इतके आर्थिक सहाय्य देऊन अनिष्ट तफावतीतून येणेकरीता आर्थिक सहाय्य करणेत आले आहे.

मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जाच्या वसुलीसपात्र रक्कमेची १००% मुदतीत पुर्णफेड करणाऱ्या प्राथमिक शेती सहकारी संस्थांना व थेट कर्जदारांना, त्यांनी आर्थिक वर्षात एकूण दिलेल्या व्याजाच्या रक्कमेत ०.५०% सुट (रिबेट) अशी प्रोत्साहन योजना राबविणेत येते.

शेती संस्थांना सोसावा लागणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी बँकेने संस्था सहाय्य निधीतून जिल्ह्यातील प्राथमिक शेती संस्थांसाठी चालू वर्षात संस्था सहाय्य निधीमधून जिल्ह्यातील १५७ संस्थांना ₹३५९.२७ लाख इतकी रक्कम आर्थिक सहाय्य स्वरुपात दिली आहे.

सामाजिक बांधिलकी

सामाजिक बांधिलकी म्हणून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेच्या कॉन्टीजन्ट (आकस्मिक) निधीमधून नैसर्गिक आपत्ती, जळीतग्रस्त, मुलींचे आश्रमाकरीता, विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजनाकरीता तसेच कृषि व पशु प्रदर्शन, ग्रामीण कृषी व सहकार साहित्य संम्मेलन, शेतकरी मेळावे, शाळांना आवश्यक वस्तु खरेदी करणेकरीता तसेच इतर कारणांसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button