
देवरुख दि. १६ (सुरेश सप्रे) :- संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अ. प. गट) युवक अध्यक्षपदी पाटगांव येथील प्रतीक सुनील साळवी यांची निवड करण्यात आली आहे.
प्रतीक साळवी हे कुंभार समाजाचे विभागीय अध्यक्ष असून, धडाडीचे कार्यकर्ते आहेत. आम. शेखर निकम यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तालुक्यात विविध मंडळाचे माध्यमातून सामाजिक कामात पुढाकार घेऊन सहभागी असतात. त्यांचा जनसंपर्क उत्तम असून त्यांच्या मितभाषी स्वभाव व अडीअडचणीला धावून जात मदत करण्यासाठी मोठा सहभाग असतो.
संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रतीक यांची युवक तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी अजिंक्य आंब्रे, जिप सदस्य सुशील भायजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनीफ भाई हरचिरकर, संघटक बाळू ढवळे, युवक काँग्रेसचे मावळते तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर उपसभापती प्रफुल बाईत, पं. स. सदस्य मंगेश बंडागळे, आरुषी घवाली आदीसह युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देवरुख शहरासह तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील बूथ कमिट्या मजबूत करत पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रतीक साळवी यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी पुढाकार घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा असा असे आवाहन तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांनी मार्गदर्शन करताना केले.
शासनाच्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी करुन तालुक्यातील युवकांना एकत्र करत स्वावावलंबी बनविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील यासाठी झोकून देऊन काम करत पदाला न्याय देत पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करीन अशी ग्वाही प्रतीक साळवी यांनी बोलताना दिली.
तालुकाध्यक्ष पदी निवड झालेल्या साळवी यांचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, तालुकासंपर्क प्रमुख तुकाराम मेस्त्री, महिला तालुका अध्यक्ष सौ मानसी करंबेळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख उमेश महाडिक, पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल बाईत, जि. प. सदस्य सुशील भायजे, पंचायत समितीचे सदस्य मंगेश बांडागळे,पंचायत समिती सदस्या सौ आरुषी घवाळी, चिपळूण संगमेश्वर युवक क्षेत्र अध्यक्ष बंधू सुर्वे, नगरसेवक यशवंत गोपाळ, दिपक खेडेकर, माजी उपसरपंच अमित जाधव,आदींनी अभिनंदन केले.



