रत्नागिरी

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार यांची रत्नागिरी जिल्हा भाजप सचिव राजू भाटलेकर यांनी घेतली सदिच्छा भेट

रत्नागिरी दि. १८ :- राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. आशिष शेलार यांची रत्नागिरी जिल्हा भाजप सचिव श्री. राजू भाटलेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन सादर केले.

यावेळी गणपतीपुळे, जिल्हा रत्नागिरी येथे कोकणातील समृद्ध कला, लोकसंस्कृती व परंपरा देश–विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना सादर करता याव्यात यासाठी ऑडिटोरियम व सांस्कृतिक केंद्र मंजूर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या उपक्रमातून कोकणातील कला पर्यटकांपर्यंत पोहोचेल. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणार असून, कलाकारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. कोकणाची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button